परभणी : मानवत तालुक्यातील इरळद पाटीजवळ भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बोलेरो पिकअप गाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात २ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवार, दि. १० जून रोजी दुपारी ३.१५ वाजताच्या सुमारास मानवतरोड- सेलू महामार्गावर घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सेलूकडून मानवतरोडकडे येणारी कार (क्र. एमएच ४३ एजे ८५७९) रस्त्याचे काम करणाºया ( क्र. एमएच २९ बीई ५३८१) रस्त्याच्या कडेला उभ्या असणाºया बोलेरो पिकअप वाहनावर धडकली. कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे समजहते. या अपघातात कारमधील सुरज निर्वळ (रा. सोमठाणा), कैलास शिंदे (रा. हत्तलवाडी, ता. मानवत) हे २ जण गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक पुरुषोत्तम भिसे यांनी १०८ आपत्कालीन रुग्णवाहिकेला कॉल करून संपर्क साधला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत डॉ. रेहान व रुग्णवाहिका चालक भानुदास बाराहाते घटनास्थळी दाखल झाले. त्यानंी ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी परभणीला नेले. या अपघातामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. यावेळी घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत केली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
















