21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयकोलकात्यात ३१ डिसेंबरपासून धावणार अंडरवॉटर मेट्रो

कोलकात्यात ३१ डिसेंबरपासून धावणार अंडरवॉटर मेट्रो

कोलकाता : वर्ष १९८४ मध्ये जेव्हा देशातील पहिली मेट्रो ट्रेन कोलकात्यातून धावली. मार्ग उत्तर-दक्षिण कॉरिडॉर (ब्लू लाइन) होता. ३९ वर्षांनंतर सार्वजनिक वाहतुकीच्या इतिहासात पुन्हा एकदा कोलकात्याचे नाव नोंदवले जाणार आहे. देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रो रेल्वे ३१ डिसेंबर २०२३ रोजी येथून धावणार आहे. येथे, जमिनीपासून ३३ मीटर आणि हुगळी नदीच्या पृष्ठभागाच्या १३ मीटर खाली ५२० मीटर लांबीच्या बोगद्यात दोन ट्रॅक टाकण्यात आले आहेत.

हावडा स्टेशन ते महाकरण स्टेशन असा ५२० मीटर लांबीचा प्रवास मेट्रो एका बोगद्याद्वारे पूर्ण करेल. ट्रेन ८० किमी/तास या वेगाने फक्त ४५ सेकंदांत बोगदा पार करेल. या बोगद्याद्वारे हावडा थेट कोलकात्याशी जोडला जाईल आणि दररोज ७ ते १० लाख लोकांचा प्रवास सुकर होईल. २१ एप्रिल रोजी त्याची चाचणी घेण्यात आली. सय्यद मोहम्मद, संचालक (प्रकल्प आणि नियोजन), कोलकाता मेट्रो रेल कॉर्पोरेशन. जमील हसन सांगतात की, २०१० मध्ये बोगदा बांधण्याचे कंत्राट अफकॉन्स कंपनीला देण्यात आले होते. अ‍ॅफकॉनने जर्मन कंपनी हेरेनकनेक्टकडून सेल बोअरिंग मशिन मिळवली. अ‍ॅफकॉन कर्मचा-याच्या मुलींच्या नावावरून या मशीनची नावे प्रेरणा आणि रचना अशी ठेवण्यात आली आहेत.

दोन मोठी आव्हाने
या प्रकल्पासमोर दोन मोठी आव्हाने होती. प्रथम, खोदण्यासाठी योग्य मातीची निवड आणि दुसरे, कोलकातामध्ये दर ५० मीटरवर टीबीएमची सुरक्षितता. वेगवेगळ्या प्रकारची माती वेगवेगळ्या अंतरावर आढळते. बोगद्यासाठी योग्य जागा ओळखण्यासाठी ५-६ महिने माती सर्वेक्षणातच घालवले गेले, ३ ते ४ सर्वेक्षणानंतर हावडा पूल हुगळी नदीच्या पात्रापासून १३ मीटर अंतरावर खाली जमिनीत बोगदा तयार होऊ शकतो असे ठरले.

जगातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन
काही अंडरवॉटर मेट्रो मार्ग पूर्व-पश्चिम कॉरिडॉरचा (ग्रीन लाइन) भाग आहेत, ज्यामध्ये हावडा मैदान ते एस्प्लेनेड हा ४.८ किमीचा मार्ग तयार आहे. यात ४ भूमिगत स्थानके आहेत. हावडा मैदान, हावडा स्टेशन, महाकरण आणि एस्प्लेनेड. हावडा स्टेशन जमिनीपासून ३० मीटर अंतरावर आहे. हे जगातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन आहे. सध्या, पाण्याखालील मेट्रो मार्ग फक्त लंडन आणि पॅरिसमध्ये आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR