16.2 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeराष्ट्रीयवैभव गहलोत यांची ९ तास चौकशी; १६ नोव्हेंबरला ईडीने पुन्हा बोलावले

वैभव गहलोत यांची ९ तास चौकशी; १६ नोव्हेंबरला ईडीने पुन्हा बोलावले

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांचा मुलगा आणि राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे (आरसीए) अध्यक्ष वैभव गेहलोत परकीय चलन नियामक कायद्याचे (फेमा) उल्लंघन केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चौकशीला सामोरे जात आहेत. वैभव गेहलोत सोमवारी सकाळी दिल्लीतील ईडी कार्यालयात हजर झाले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची जवळपास ९ तास चौकशी केली. वैभव गेहलोत यांना १६ नोव्हेंबरला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

रिपोर्टनुसार, ईडीने सर्वप्रथम अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत याची ४ तास चौकशी केली. यानंतर त्यांना लंच ब्रेक देण्यात आला. त्यानंतर चौकशीची दुसरी फेरी सुरू झाली, जी सुमारे ५ तास चालली. पहिल्या फेरीच्या चौकशीनंतर वैभव गहलोत म्हणाले की, कोणताही परदेशी व्यवहार झाला नसून हे फेमाचे प्रकरण बनत नाही. २५ ऑक्टोबर रोजी ईडीने वैभव गेहलोत यांना समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले होते. वैभव यांनी हजर राहण्यासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत मुदत मागितली होती. वकिलांचा सल्ला घेतल्यानंतर वैभव त्यांच्या कंपन्यांशी संबंधित कागदपत्रांसह ईडीसमोर हजर झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR