मुंबई : निवडणुका असलेली पाच राज्ये अत्यंत महत्त्वाची आहेत. या विषयावर प्रत्यक्ष निकालानंतर आपण चर्चा करु. या पाच राज्यात परिवर्तणाची दिशा ही दिल्लीतील सत्ता परिवर्तणाची झलक असल्याचे मत उद्धव ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. तुम्ही काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली होती. मात्र, तशी घोषणा करणाऱ्यांना काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी घाम फोडला. काँग्रेसचा विजय म्हणजे इंडिया आघाडीचा विजय असल्याचे मी मानतो, असेही खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी दावा केला की, राजस्थानसह चारही राज्यात इंडिया आघाडीचे सरकार असेल. २०२४ नंतर उलेटे चक्र सुरु होणार आहे. काँग्रेसचा विजय म्हणजे इंडिया आघाडीचा विजय. पाचही राज्यात परिवर्तणाची लाट दिसून येत असल्याचेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे यावेळी बोलताना संजय राऊतांनी एक भाकीतही केले आहे. ३१ डिसेंबरनंतर मुख्यमंत्रिपद रिकामे होणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार, असे भाकीत संजय राऊतांनी वर्तवले आहे.
राऊत म्हणाले की, पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर दबाव आणून ज्या गुन्ह्यांमध्ये जामीन मिळू शकतो, अशा गुन्ह्यांमध्येही राजकीय कार्यकर्त्यांना तुरुंगात ठेवायचे आणि आमच्याकडे सत्ता आहे. आम्ही राजकीय विरोधकांच्या विरोधात सत्ता कशी वापरू शकतो, हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांनी स्वतःची बाजू न्यायालयात वेळेत मांडू नये म्हणून दबाव टाकला जात आहे. २०२४ पासून उलटे चक्र सुरू होईल, असे ते म्हणाले.