17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरविजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर : भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने नियुक्ती केली आहे. रहाटकर यांनी यापूर्वी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषवणा-या विजया रहाटकर पहिल्याच मराठी व्यक्ती ठरल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेत नगरसेवक, महापौर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष ते राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष असा चढता आलेख रहाटकर यांचा राहीला आहे.

भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असतानाच विजया रहाटकर यांनी २०१६ ते २०२१ मध्ये महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून काम पाहिले. या कार्यकाळात त्यांनी सक्षमा, प्रज्ज्वला, सुहिता यांसारखे महिला केंद्रित अनेक यशस्वी उपक्रम राबवले. संवैधानिक दर्जा असणा-या राष्ट्रीय महिला आयोगाला अत्यंत व्यापक अधिकार असून केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे. भौतिक शास्त्रात पदवी आणि इतिहासात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विजया रहाटकर यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यामध्ये विधिलिखित या महिलांच्या कायदेविषयक पुस्तक मालिकेचे संपादन, अग्निशिखा धडाडू द्या, औरंगाबाद : लीडिंग टू वाईड रोड्स, मॅजिक ऑफ ब्लू फ्लेम यांचा समावेश आहे. महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रीय कायदा पुरस्कार, तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा सावित्रीबाई फुले पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आले आहे.

राज्य महिला आयोगात भरीव कार्य
रहाटकर यांनी राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविताना भरीव कार्य केले आहे. सक्षमा उपक्रमामधून अ‍ॅसिड हल्ला पीडितांना दिलासा दिला. प्रज्ज्वला योजनेतून केंद्र सरकारच्या योजनांशी लाखो महिलांना जोडून घेतले. सुहिता योजनेतून महिलांना २४Ÿ७ हेल्पलाइन उपलब्ध करून दिली. निर्मल वारी योजनेतून लाखो महिला वारक-यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या. महिला केंद्रित विकास आणि महिला नेतृत्वाखाली विकास या संकल्पनांना कायदेशीर सुधारणांचा आधार मिळावा यासाठी वेगवेगळ्या सुधारणा सुचविल्या. त्यात पोस्को सेल, ट्रिपल तलाक सेल, तसेच मानवी तस्करी विरोधात विशेष सेलची निर्मिती यांचा समावेश आहे. डिजिटल लिट्रसी, महिला आयोग आपल्या दारी, महिला आयोगाचे साद नियतकालिक यासारखे उपक्रम देखील घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR