28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरक्रिकेट सामन्यात गोंधळाचा ‘इशारा’; तरुणाला लातूरमधून अटक

क्रिकेट सामन्यात गोंधळाचा ‘इशारा’; तरुणाला लातूरमधून अटक

लातूर : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणा-या भारत विरुद्ध न्यूझिलंड सेमी फायनल सामन्यादरम्यान मोठी घटना घडेल, अशी धमकी देणा-या तरुणाला मुंबई पोलिसांकडून थेट लातूरमधून अटक करण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने ट्वीटरच्या माध्यमातून मुंबई पोलिसांना धमकी दिली होती. विशेष म्हणजे, धमकी देणा-या व्यक्तीने ट्वीटरवर मुंबई पोलिसांना बंदूक, हँडग्रेनेड आणि गोळ्यांच्या फोटोमध्ये टॅग केले आहे. याशिवाय सामन्यादरम्यान आम्ही आग लावू, असा संदेश देणारा फोटोही पोस्ट करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी तपास करत त्याला लातूरमधून ताब्यात घेतले आहे.

वानखेडे स्टेडियमवरील भारत विरुद्ध न्यूझिलंड क्रिकेट सामन्यात गोंधळ होणार असल्याचा ‘इशारा’ समाजमाध्यमांतून दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने लातूर येथील एका १७ वर्षीय तरुणास ताब्यात घेतले आहे. स्वत:स क्रिकेटप्रेमी म्हणवणा-या तरुणाने ट्वीटरवरून हा इशारा दिला होता. सध्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू असून, वानखेडे स्टेडियमवर होणा-या भारत-न्यूझिलंड सामन्यादरम्यान गोंधळ होणार आहे, अशा आशयाचा इशारा त्याने ट्वीटरवरील पोस्टद्वारे दिला होता.

पोलिसांनी या प्रकरणी तातडीने दखल घेत तपास सुरू केला होता. दरम्यान, पोलिसांनी धमकी आलेल्या ट्वीटर हँडलचा तांत्रिकदृष्ट्या तपास केला असता, हे ट्वीट लातूरमधून करण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने थेट लातूरमधून या तरुणाला ताब्यात घेतले आहे.

मुंबई पोलिसांना पोस्ट केली ‘टॅग’
विशेष म्हणजे, धमकी देणा-या तरुणाने ट्वीटरवर मुंबई पोलिसांना बंदूक, हातबॉम्ब आणि बंदुकीच्या गोळ्यांची चित्रेही त्याने पोस्ट केली होती. तसेच, त्याने या पोस्टमध्ये मुंबई पोलिसांचे अधिकृत ‘ट्वीटर हँडल’ही टॅग केले होते. यानंतर पोलिसांनी खबरदारी म्हणून स्टेडियम आणि परिसरातील बंदोबस्तात अधिक वाढ केली होती.

स्टेडियम आणि परिसरात मोठा बंदोबस्त…
भारत-न्यूझिलंड सामन्यादरम्यान कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांकडून १५० हून अधिक अधिका-यांसह सुमारे ६०० पोलिस कर्मचारी, ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच जलद प्रतिसाद दल, राज्य राखीव पोलिस बल आणि दंगल नियंत्रक पथकातील पोलिस असा मोठा बंदोबस्त तेथे ठेवण्यात आला होता. तसेच पोलिसांकडून परिसरात सतत पेट्रोलिंग करण्यात येत होती. सोबतच मुंबई पोलिस दलाचे वरिष्ठ अधिकारी देखील सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR