देशातील बहुतांश रेल्वे स्थानकांवरील पाणी दूषित

नवी दिल्ली/ मुंबई : रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेसह मूलभूत सुविधांबाबत नियंत्रक आणि महालेखापरीक्षक अर्थात कॅग च्या अहवालातून अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. या तपासणीत अनेक स्थानकांवर पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेत त्रुटी आढळल्या असून अनेक रेल्वे स्थानकांतील पाणी हे दूषित आहे असे या अहवालात म्हटले आहे. संसदेत सादर करण्यात आलेल्या या अहवालात देशातील ५१२ रेल्वे स्थानकांवरील प्रवासी सुविधा आणि स्वच्छतेची तपासणी करण्यात आल्याचे या अहवालात म्हटले आहे.

देशातील काही रेल्वे स्थानकांतील पाण्यामध्ये मानवी विष्ठेत आढळणारे ई-कोलाय जीवाणू आढळले आहेत. रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलर आणि नळांमधून घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या नमुन्यांच्या तपासणीत टोटल कोलिफॉर्म्स जीवाणू आढळले असून यात ई-कोलायचाही समावेश आहे. ई-कोलायच्या काही प्रकारामुळे अन्नातून विषबाधा, अतिसार आणि गंभीर परिस्थितीत मूत्रपिंड निकामी होण्याची समस्या उद्भवू शकते. कॅगने देशभरातील विविध रेल्वे विभागांमधील ४१२ बिगर-उपनगरीय स्थानकांवरील प्रवासी सुविधांचा आढावा घेतला. या तपासणीत दक्षिण रेल्वेच्या कोईम्बतूर आणि पालक्काड, दक्षिण मध्य रेल्वेच्या हैदराबाद, मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), भिवंडी रोड, कल्याण, लोणावळा आणि पूर्व रेल्वेच्या मधुपूर या स्थानकांमधील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत गंभीर बाब समोर आली आहे.

मुंबई-दिल्ली स्थानकांतही सुविधांची कमतरता
एनएसजी-१ श्रेणीतील मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), कोलकात्यातील हावडा आणि सियालदह तसेच नवी दिल्ली या प्रसिद्ध रेल्वे स्थानकांतसुद्धा काही मूलभूत सुविधांची कमतरता आढळली आहे असे कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या स्थानकांवर बसण्याची व्यवस्था, कचरापेट्या, इलेक्ट्रॉनिक माहिती फलक यासारख्या सुविधांमध्ये त्रुटी आढळल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

४५८ स्थानकांत सुविधा अपु-या
कॅगच्या पाहणीत केवळ पाण्याच्या गुणवत्तेचीच समस्या नाही, तर रेल्वे स्थानकांवरील मूलभूत सुविधाही अपु-या आहेत. निवडलेल्या ५१२ स्थानकांपैकी ४५८ स्थानकांवर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. रेल्वे स्थानकांत ज्या अपु-या सुविधा आहेत. त्यामध्ये प्रतीक्षागृह, पंखे, पादचारी पूल, कचरापेटया, शौचालये, मूत्रालये, नळ बसवण्याची जागा तसेच इतर मूलभूत सुविधांचा समावेश आहे.

कॅगच्या रेल्वेला शिफारसी
देशातील विविध राज्यातील रेल्वे स्थानकातील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत आढळलेल्या त्रुटींच्या पार्श्वभूमीवर कॅगने रेल्वेला पाण्याची सर्वसमावेशक गुणवत्ता तपासणी करण्याची शिफारस केली आहे. तसेच पाण्याच्या गुणवत्तेसंदर्भातील विहित नियमावलीचे काटोकोर पालन सुनिश्चित करण्याची सूचना केली आहे. स्थानकांवरील पिण्याचे पाणी आणि प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या मूलभूत सुविधाकडे लक्ष देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Dhiraj Deshmukh|लातूरमध्ये दुष्काळाची छाया; सोयाबीन पिकाची पाहणी करत माजी आमदार धीरज देशमुख आक्रमक
03:57
Video thumbnail
Latur|सलगऱ्यात ९२ फुटी भव्य अस्थी विसर्जन घाट! देविदास गुरधाळे मामा यांच्या स्मरणार्थ मोठा प्रकल्प
04:51
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
19:07
Video thumbnail
Jalkot|घागरदऱ्यात हर हर महादेवचा जयघोष; दर्शनासाठी हजारोंची गर्दी
01:40
Video thumbnail
BREAKING : लातूरकरांनो सावधान! मांजरा धरणाची पाणीपातळी चिंताजनक!
02:23
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये शिवसेना उबाठाचा सरकारविरोधात एल्गार! गांधी चौकात होणार महाआंदोलन
04:20
Video thumbnail
Nanded|पाऊस नाही, पिके करपली! शेतकऱ्यांना हेक्टरी ₹५० हजार मदतीची मागणी
01:44
Video thumbnail
Nanded|हातात लग्नाचा बॅनर घेऊन तरुण टॉवरवर! कौटुंबिक त्रासाचा आरोप | लोह्यात खळबळ
00:46
Video thumbnail
Nanded|गणरायाचं विसर्जन करायचं कुठे? नांदेडमध्ये नदी-खदानी कोरड्या | महापालिकेसमोर संकट
02:26
Video thumbnail
Latur|खरगे यांच्या अवमानाविरोधात पुरोगामी संघटना एकवटल्या! गांधी चौकात निषेध सभा
03:14
Video thumbnail
Latur|जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तरुण टॉवरवर! रेणापूरच्या कोरेगावातील आंदोलन
02:04
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पिके सुकली! कोरडा दुष्काळ जाहीर करा, राजीव कसबेंची सरकारकडे मागणी
02:05
Video thumbnail
Latur|मातीपासून घडवला गणराया! केशवराज महाविद्यालयात १५० विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
02:53
Video thumbnail
Nanded|हदगावमध्ये मराठा आरक्षणासाठी एल्गार! शिवसेना आमदाराच्या कार्यालयातच आमरण उपोषण
02:28
Video thumbnail
Latur|एकमत डिजिटलच्या बातमीचा इम्पॅक्ट! लातूरला राज्यस्तरीय खो-खोचे यजमानपद
02:13

Latest news