15.6 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeराष्ट्रीयवायनाड भूस्खलनात मृतांचा आकडा ४३ वर

वायनाड भूस्खलनात मृतांचा आकडा ४३ वर

नदीमध्ये मृतदेह तरंगले रस्ते-पूल खचले, २०० घरे तुटली

वायनाड : केरळमधील वायनाडमध्ये मुसळधार पावसादरम्यान झालेल्या भूस्खलनाच्या घटनेत १०० हून अधिक लोक अडकल्याचे वृत्त आहे. येथे मोठ्या प्रमाणावर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला असून यात काही मुलांचाही समावेश आहे. याशिवाय या भीषण भूस्खलनात जवळपास २०० घरांचे नुकसान झाल्याचे समजते. तसेच, मुसळधार पावसामुळे रस्ते आणि पूलही खचले आहेत. तर एका नदीत मृतदेह वाहून जातानाही दिसून आल्याची घटना घडली आहे.

केरळमधील वायनाडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी पहाटेच्या सुमारास ४ तासांत ३ मोठ्या भूस्खलनाच्या घटना घडल्या. मुंडक्कई, चुरलमाला, अट्टामाला आणि नूलपुझा या गावांना भूस्खलनाचा मोठा तडाखा बसला आहे. या गावांमधील शेकडो घरे ढिगा-याखाली गाडली गेली आहेत. एकट्या चुरलमाला येथेच २०० घरांना या दूर्घटनेचा तडाखा बसला आहे.

मृतदेह नदीत वाहले
अट्टामाला मधील लोकांना नदीमध्ये ६ मृतदेह वाहतांना आढळून आले आहेत. तर, शेकडो लोक अद्यापही बेपत्ता आहेत. या भूस्खलनाचा सर्वाधिक फटका हा चुरलमालाला बसला आहे. येथे घरांच्या बाहेर असलेली वाहने, दुकाने आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

पंतप्रधानांकडून मदतीची घोषणा
या प्रचंड भूस्खलनात ढिगा-याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लष्कराचे हेलिकॉप्टर वायनाडला रवाना झाले आहेत. या दूर्घटनेनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची आर्थिक मदतही जाहीर केली आहे. याशिवाय जखमींनाही ५० हजार रुपये जाहीर केले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR