20.2 C
Latur
Thursday, November 14, 2024
Homeअंतरराष्ट्रीयआम्हाला लहान मुलींशी लग्न करण्याची मुभा

आम्हाला लहान मुलींशी लग्न करण्याची मुभा

पाकच्या मौलाना मुफ्तीचे विचित्र विधान

इस्लामाबाद : पाकिस्तानचे मौलाना मुफ्ती तारिक मसूद आपल्या विचित्र विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा त्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मौलाना मुस्लिम लहान मुलींशी लग्न करण्याचे कारण सांगत आहे.

व्हिडिओमध्ये म्हटले आहे की अल्लाहने मुस्लिमांना मुलांशी लग्न करण्याची परवानगी दिली आहे कारण मुली त्यांच्या पालकांवर ओझे असतात. मौलाना मुफ्ती तारिक मसूद यांनी दिलेल्या वादग्रस्त विधानाशी संबंधित व्हीडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ही व्हायरल क्लिप आतापर्यंत २० हजारांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे. या व्हायरल व्हीडीओमध्ये तारिक मसूद पुढे म्हणाले की, जर आपण मुलींना अधिक शिक्षण दिले तर भविष्यात सासरचे लोक त्याचा फायदा घेतील. म्हणूनच अल्लाहने म्हटले आहे की, मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी जो तिच्याशी लग्न करेल आणि तिला आपल्या घरी घेऊन जाईल. यामुळेच अल्लाहने मुस्लिमांना अल्पवयीन मुलींशी लग्न करण्याची परवानगी दिली आहे.

मुस्लिमांना अल्पवयीन मुलींशी लग्नाची परवानगी
व्हायरल होत असलेल्या या व्हीडीओमध्ये मौलाना मुफ्ती तारिक मसूद म्हणाले की, मुलगी दुस-याच्या घरी जन्माला येते आणि जबाबदारी दुस-यावर असते. त्यामुळे लहान वयातही अशी जबाबदारी दुस-यावर सोपवली जाऊ शकते. म्हणूनच इस्लाम धर्मात अल्पवयीन मुलींचे विवाह कायदेशीर मानले गेले आहेत.

कोणाची शिकवण आहे ही?’
मौलानच्या या व्हीडीओवर आता लोकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हीडीओवर कमेंट करताना एक यूजर म्हणाला, तुम्हाला कोणी ट्रेनिंग दिले आहे. तर दुसरा म्हणाला वाह काय ट्रेनिंग आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR