22.3 C
Latur
Saturday, November 16, 2024
Homeमहाराष्ट्र‘दहशतमुक्त’ महाराष्ट्र हवा!

‘दहशतमुक्त’ महाराष्ट्र हवा!

प्रियंका गांधींकडून ‘जय भवानी’चा घोष

शिर्डी : प्रतिनिधी
‘जय भवानी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘साईबाबाजी की जय’ अशी घोषणा देत काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिव प्रियंका गांधी यांनी दौलतबाग येथे भाषणाला सुरुवात केली. त्या म्हणाल्या, आज येथे सभा होत आहे, त्या मैदानाजवळ साईबाबा बसत होते. आज पहिल्यांदा मला साईबाबांच्या मंदिरात जाण्याचे सौभाग्य मिळाले. आणि खरोखरच ही पवित्र भूमी असल्याची अनुभूती झाली.

महाराष्ट्र सामाजिक क्रांतीची धरती आहे. महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांची ही धरती असून येथे कणाकणात सत्य, समानता, मानवता आहे. महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली. असेही त्या म्हणाल्या.

शिर्डी मतदारसंघातील दहशत मोडून काढण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे. शिर्डी मतदारसंघात ‘दहशत से आझादी’ हवी आहे. ज्यांना विखेंना, भारतीय जनता पक्षाला, जातीयवादाला विरोध करायचा आहे. त्यांनी शिर्डी मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांना मतदान करावे. असे आवाहन आमदार थोरात यांनी करत लाडक्या बहिणींनी महिन्याला तीन हजार रुपये देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे असे सांगितले.

प्रियंकासाठी घोगरे काकींच्या चारोळ्या
प्रचार सभेत प्रभावती घोगरे यांनी आपल्या भाषणातून प्रियांका गांधी यांच्यासाठी चारोळी ऐकविल्या. त्या म्हणाल्या, मै कहूंगी तुफान के साथ आँधी है, ये दुसरी इंदिरा गांधी है. त्यानंतर उपस्थितांनी प्रचंड प्रतिसाद दिला. त्यानंतर ‘प्रियांका जी आप में दिखती है इंदिराजी की झांकी, अभी बीजेपी को हराना है बाकी. त्यांच्या या अफलातून चारोळीवर प्रियांका गांधींनीही दाद दिली. त्यांनाही हसू आवरले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR