नवी दिल्ली : भात हे भारतातील प्रमुख पिकांपैकी एक आहे. भारतातील पिकांपैकी एक चतुर्थांश भाग हा तांदूळ पिकाने व्यापला आहे. तांदूळ उत्पादनात भारत जगात अग्रेसर आहे. जगातील इतर अनेक देश प्रामुख्याने भातशेती करतात. ऊस आणि मकानंतर भात जगातील तिसरे सर्वात जास्त लागवड केलेले पीक आहे. तांदळापासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवू शकता. दरम्यान, तांदूळ उत्पादनात पश्चिम बंगाल हा अव्वलस्थानी असून बंगालमध्ये तांदळाचे सर्वाधिक उत्पादन होत आहे.
तांदूळ हा भारतीय खाद्यपदार्थातील महत्त्वाचा पदार्थ आहे. व्हिटॅमिन बी, मँगनीज, सेलेनियम, मॅग्नेशियम आणि फायबर पुरेशा प्रमाणात भातामध्ये आढळतात. भारतात तांदळाचे सर्वाधिक उत्पादन होते. देशातील कोणत्या राज्यात तांदळाचे सर्वात जास्त उत्पादन होते.
पश्चिम बंगालमध्ये तांदळाचे सर्वाधिक उत्पादन
छत्तीसगडमध्ये जरी मोठ्या प्रमाणात तांदळाचे उत्पादन होत असले तरी भारतात सर्वाधिक तांदळाचे उत्पादन पश्चिम बंगालमध्ये होते. म्हणजेच भारतात तांदूळ उत्पादनात हे पश्चिम बंगाल हे राज्य आघाडीवर आहे. येथील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात तांदळाचे उत्पादन घेतात. देशातील एकूण तांदूळ उत्पादनात बंगालचा वाटा १३.६२ टक्के आहे.
सर्वात जास्त उत्पादन करणारी ३ राज्य कोणती?
तांदूळ उत्पादनात अग्रेसर असलेल्या पहिल्या तीन राज्याबद्दल बोलायचे झाल्यास पश्चिम बंगाल हे पहिल्या क्रमांकावर आहे. तिथे एकूण उत्पादन हे १३.६२ टक्के होते. तर त्याचवेळी, उत्तर प्रदेशमध्ये तांदळाचे उत्पादन हे १२.८१ टक्क्यांसह दुस-या क्रमांकावर आहे. पंजाब तिस-या क्रमांकावर आहे, ज्याचा एकूण वाटा ९.९६ टक्के आहे.
तांदळाचे फायदे आणि पोषक तत्वे
व्हिटॅमिन बी, मँगनीज, सेलेनियम, मॅग्नेशियम आणि फायबर पुरेशा प्रमाणात भातामध्ये आढळतात. हे सर्व पोषक तत्व शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहेत. तसेच भातापासून बनवलेली खिचडी एक चमचा तूप मिसळून खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. तुमचे पोट हलके ठेवण्यास देखील मदत करते. याशिवाय भात खाल्ल्याने अनेक आजारांपासून आराम मिळतो.