24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रआमचे लोक अटक करण्यामागे सरकारचा कोणता डाव?

आमचे लोक अटक करण्यामागे सरकारचा कोणता डाव?

मुंबई : आमच्या लोकांना अटक करणार नाही असे आश्वासन सरकारने दिले होते तरीही जालन्यातून सरकारने आमच्या काही लोकांना अटक केली आहे. यामागे सरकारचा कोणता डाव आहे? असा प्रश्न मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विचारला आहे. तसेच छगन भुजबळ गप्प राहिले तर आम्हीही गप्प राहू असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

अंतरवालीतले कार्यकर्त्यांना अटक करणार नाही असे सरकारने सांगितले होते. मग आमच्या लोकांना अटक करण्याचे कारण काय? आमच्या लोकांना अटक करून आम्हाला बदनाम करण्याचा डाव रचला आहे का? आमच्यावर अन्याय झाला आहे हे सांगून तुमच्या कार्यकर्त्यांना अटक करणार नाही हे सरकारने सांगितल्े होत्े. मात्र आता आमच्या कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे.

यामागे कोणता तरी डाव आहे हे उघड आहे. सगळ्या महाराष्ट्रातलेच कार्यकर्ते आमचे आहेत. समाजाला न्याय देण्यासाठी मराठा समाज एकवटला आहे. अटक करण्याची भूमिका नव्हती तरीही अटक का केली गेली? या प्रकरणाची अधिकृत माहिती घेतली की बोलेन. आम्हाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

भुजबळांनी बोलणे बंद करावे आम्ही बोलणार नाही
छगन भुजबळांवरही मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केले, ‘छगन भुजबळ यांनी आमच्या आरक्षणाला विरोध करायला सुरुवात केली आणि ते वाट्टेल ते आरोप करत आहेत. मग आम्ही उत्तर देणारच. आम्ही छगन भुजबळ यांना कुठलाही त्रास दिला नाही. त्यांनी बोलणं बंद केलं तर आम्हीही बोलणं बंद करतो.’’ असे जरांगे पाटील म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR