28.3 C
Latur
Tuesday, November 5, 2024
Homeमहाराष्ट्रकरवीरचा बाजीगर कोण?

करवीरचा बाजीगर कोण?

राहुल पाटील-चंद्रदीप नरके यांच्यात टस्सल

कोल्हापूर : विशेष प्रतिनिधी
गगनबावडा, पन्हाळा आणि करवीर अशा तीन तालुक्यांचा हा करवीर विधानसभा मतदार संघ आहे. कोल्हापूरातील सर्वात मोठा मतदार संघ म्हणून हा मतदार संघ ओळखला जातो. २०१९ मध्ये येथे कॉँग्रेसचे पी. एन.पाटील यांचा विजय झाला होता. मागच्या दोन निवडणूकात त्यांना पराभव स्विकारावा लागला होता.

यंदा स्वर्गीय पी.एन. पाटील यांचे पूत्र राहुल पाटील आणि शिवसेना एकनाथ श्ािंदे गटाचे नेते चंद्रदीप नरके यांच्यात मुख्य लढत होणार आहे. लोकसभा निवडणूकीत याच मतदार संघातून शाहू महाराज यांना ७० हजाराचे लीड मिळाले होते. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत या मतदार संघात काय होणार याकडे लक्ष लागलेले आहे.

कोल्हापूरच्या राजकारणात अनेक गट आणि तट आहेत. येथे राजकीय पक्षापेक्षा गटा-तटाचे राजकारण चर्चेत असते. पी.एन.गट, बंटी पाटील गट, मुश्रीफ गट, महाडीक गट, घाटगे गट, कोरे गट, माने गट आणि नरके गट असे येथे अनेक गटाचे प्राबल्य चालत आहे. करवीर विधानसभा मतदार संघात तीन तालुक्यातील २७५ गावांचा समावेश आहे. त्यात करवीर तालुक्यातील १०२, पन्हाळा तालुक्यातील ६८ आणि गगनबावडा तालुक्यातील ४४ गावांचा समावेश आहे.

करवीर विधानसभा क्षेत्रावर आधी शेकापचे वर्चस्व होते. नंतर कॉँग्रेसने येथे आपला झेंडा फडकावला आहे. पी.एन.पाटील यांनी शेकापकडून हा मतदार संघ खेचून घेतला. त्यानंतर कॉँग्रेसचे पी.एन.पाटील विरुद्ध शिवसेनेचे चंद्रदीप नरके यांच्यात सामना होत आला आहे. लोकसभेला या मतदार संघातून महायुतीचे उमेदवार शाहु महाराज यांना मिळालेली आघाडी तसेच पी.एन. पाटील यांच्या निधनानंतर असलेली सहानुभूती ही राहुल पाटील यांच्यासाठी जमेची बाजू असणार आहे.

करवीरमध्ये कोणाचे पारडे जड
कॉँग्रेसचे नेते पी.एन.पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे पूत्र राहुल पाटील यांना सुहानुभूती आहे. तसेच करवीर या मतदार संघाच्या विजयासाठी सतेज पाटील यांची ताकद राहुल पाटील यांच्या विजयासाठी महत्वाची ठरणार आहे. त्यांच्या विरोधात उभे असलेल्या शिवसेना चंद्रदीप नरके यांना पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक यांची ताकद महत्वाची ठरणार आहे. स्वर्गीय पी.एन.पाटील यांच्या पश्चात राहुल पाटील यांना सहानुभूती असून यावेळी शेकापची ताकदही राहुल पाटील यांना मिळणार आहे. दुसरीकडे नरके यांना विरोधी गटातील अनेक कार्यकर्ते फोडण्यात यश मिळाल्याने त्यांचा लाभ कसा मिळणार यावर या लढतीचे भवितव्य अवलंबून आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR