नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये रविवारी विश्वचषकाची फायनल रंगणार आहे. या सामन्याबाबत अनेक दिग्गजांच्या प्रतिक्रिया आणि भाकित येत आहेत. ऑस्ट्रेलियाचा धाकड फलंदाज मिचेल मार्श याने तर रोहित शर्मा आणि टीम इंडियाला थेट इशाराच दिला आहे. विश्वचषकात भारतीय संघाला फक्त ६५ धावांवर ऑलआऊट करु, असे मिचेल मार्श याने म्हटले आहे. त्यानंतर मार्शची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. दिल्ली कॅप्टिलच्या पॉडकॉस्टमध्ये बोलताना मिचेल मार्श याने एकप्रकारे टीम इंडियाला धमकी दिली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषकाच्या अभियानाची सुरुवात अतिशय खराब झाली होती. भारताकडून त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागाला होता. त्यानंतर आफ्रिकेनेही त्यांची दयनिय अवस्था केली होती. त्यानंतर लंकेचा पराभव करत त्यांनी विजयी सुरुवात केली. साखळी सामन्यात भारताने कांगारुचा पराभव केला होता. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया चाचपडताना दिसला.
२१३ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिायची पुरती भंबेरी उडाली होती. पॅट कमिन्स अन् मिचेल स्टार्क यांच्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजय मिळला होता. या सामन्यात मार्शला खातेही उघडता आले नव्हते. पण भारताविरोधात होणा-या फायनलआधी त्याने हुंकार भरली आहे.
फायनलआधी मिशेल मार्श याचा आत्मविश्वास वाढला आहे. त्याने थेट फॉर्मात असणा-या टीम इंडियालाच इशारा देत भविष्यवाणी केली आहे. विश्वचषकात भारतीय संघाला फक्त ६५ धावांत ऑलआऊट करु, असे म्हटले आहे. त्याचे हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे.