30.1 C
Latur
Friday, May 17, 2024
HomeFeaturedजातीय जनगणना करणार, अ‍ॅप्रेन्टिसशिप कायदा आणणार : राहुल गांधी

जातीय जनगणना करणार, अ‍ॅप्रेन्टिसशिप कायदा आणणार : राहुल गांधी

भंडारा : इंडिया आघाडीचे सरकार आल्यास जातीय जनगणना केली जाईल, असे आश्वासन राहुल गांधी यांनी भंडारा जिल्ह्यातील निवडणूक प्रचार सभेत दिले.

१० वर्षात मोदींनी उद्योगपतींसाठी सरकार चालवलं, हे मोदींचं सरकार नसून अदानींचं सरकार आहे अशा शब्दात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा यात्रेदरम्यान आज भंडारा येथे सभेचे आयोजन करण्यात आले.

सरकारी सेवेतील ३० लाख रिक्त पदे भरण्यासाठी तसेच युवकांना प्रशिक्षणार्थी म्हणून काम मिळवून देण्याकरिता कायदा करू, असे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिले आहे.

ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीत सत्तेत आल्यास तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही अनेक उपाययोजना करणार आहोत. सरकारी सेवेमध्ये ३० लाख पदे रिक्त आहेत. युवकांना या पदांवर भरती करून घेण्याची मोहीम राबविण्यात येईल. सर्व पदवीधर, डिप्लोमाधारकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी इंडिया आघाडी सत्तेत आल्यास ठोस पावले उचलणार आहोत. त्यासाठी ‘प्रशिक्षणार्थी असण्याचा हक्क’ प्रदान करणारा कायदा संसदेत मंजूर केला जाईल.

राहुल गांधी यांनी म्हटले की, पुन्हा सत्तेवर आल्यास राज्यघटना बदलण्याचा भाजपचा डाव आहे. याआधी भारताकडे आदर्श लोकशाही राष्ट्र म्हणून सारे जग पाहात होते. मात्र, आता भारतामध्ये लोकशाहीला अर्थ उरलेला नाही, असे जगाचे मत बनले आहे. आर्थिक स्रोत व माध्यमांसह सर्व गोष्टींवर आपली मक्तेदारी निर्माण करण्याचे मोदी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. देशात सध्या दोन विचारसरणींमध्ये संघर्ष सुरू आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR