31.7 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्र‘तुतारी’ चिन्हावरच मतदान करणार

‘तुतारी’ चिन्हावरच मतदान करणार

बीड : लोकसभा निवडणुकीसाठी बीड जिल्ह्यातील प्रमुख भाजप, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तसेच वंचित बहुजन आघआडीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. आता प्रचाराचा जोर आणि ज्वर वाढत आहे. असे असताना जिल्ह्यातील एका गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मतदान करण्याची शपथच घेतली आहे. केज तालुक्यातील कानडीबदन गावच्या ग्रामस्थांनी रविवारी उमेदवार बजरंग सोनवणेंच्या समक्षच ही शपथ घेतली.

भाजपने दोन वेळा खासदार राहीलेल्या प्रीतम मुंडे यांची उमेदवारी टाळत राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांना मैदानात उतरविले आहे. पंकजा मुंडे यांच्यासाठी आता भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना या सत्तेतल्या तीनही पक्षांचे नेते कामाला लागले आहेत. तसेच पंकजा मुंडेंचेही दौरे सुरु आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाने बजरंग सोनवणे यांना निवडणुकीच्या ंिरगणात उतरविले आहे आणि बजरंग सोनवणेंनीही प्रचाराची जोरदार सुरुवात केली.

त्यांच्याकडून पहिल्या व दुस-या फळीतल्या नेत्यांच्या भेटीगाठींचे सत्र आणि गावागावांत जाऊन बैठका घेतल्या जात आहेत. रविवारी बजरंग सोनवणे केज तालुक्यातील कानडीबदन गावात गेल्यानंतर महिलांनी त्यांचे औक्षण केले. त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली. तसेच, मागील १० वर्षे केंद्रात सत्ता असूनही विद्यमान खासदार संपूर्णत: अपयशी ठरल्याचा आरोप करत या अपयशामुळेच त्यांची उमेदवारी टाळल्याचा दावा बजरंग सोनवणे यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR