39.6 C
Latur
Tuesday, April 30, 2024
Homeपरभणीपरभणी लोकसभा निवडणुकीसाठी वाढले १० मतदान केंद्र

परभणी लोकसभा निवडणुकीसाठी वाढले १० मतदान केंद्र

परभणी : परभणी लोकसभा निवडणुकीसाठी २०१९च्या तुलनेत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदार संख्येत मोठा प्रमाणात वाढ झाली आहे. यावेळी २१ लाखांपेक्षा जास्त मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

त्यामुळे निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून मतदान केंद्रात वाढ व्हावी यासाठी निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार या लोकसभा निवडणुकीसाठी ६ विधानसभा मतदार संघापैकी ३ मतदार संघामय्े १० मतदान केंद्र वाढविण्यात आली आहेत. यामध्ये परभणी विधानसभा मतदार संघात ६, परतूरमध्ये ३ आणि घनसावंगी मतदार संघात १ मतदान केंद्र वाढविण्यात आले आहे. त्यानुसार परभणी विधानसभेत यावेळी ३३३, परतूर विधानसभेत ३५० तर घनसावंगीत ३५३ मतदान केंद्रावर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

२०१९च्या निवडणुकीत मतदारांनी २ हजार २७७ मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला होता. आता मतदार संख्या वाढल्यामुळे यावेळी २ हजार २८७ मतदान केंद्रावर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामुळे वाढलेले मतदार आणि मतदान केंद्र या ठिकाणची मते आपल्याला कशी मिळतील यासाठी सर्वच पक्षाचे उमेदवार सरसावले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR