नवी दिल्ली : संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी सांगितले की, संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ डिसेंबरपासून सुरू होणार असून ते २२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. ‘एक्स’वरील पोस्टद्वारे त्यांनी ही माहिती दिली. या अधिवेशनात ९ दिवसात १५ बैठका होणार असल्याचे जोशी यांनी सांगितले आहे.
या अधिवेशनात प्रमुख फौजदारी कायद्यांच्या जागी तीन महत्त्वाच्या विधेयकांवर विचार होण्याची शक्यता आहे. गृहविभागाच्या स्थायी समितीने नुकताच तीन विधेयकांवरील अहवाल स्वीकारला आहे. संसदेत प्रलंबित असलेले दुसरे मोठे विधेयक मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित आहे.
पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आलेले हे विधेयक विरोधी पक्ष आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधानंतर संसदेच्या विशेष अधिवेशनात मंजूर करण्यासाठी सरकारने आग्रह धरला नाही. या विधेयकाद्वारे सरकारला मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांचा दर्जा कॅबिनेट सचिवांच्या बरोबरीने आणायचा आहे. सध्या त्यांचा दर्जा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या समकक्ष आहे.
तसेच तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर ‘पैशासाठी प्रश्न विचारल्या’च्या प्रकरणाबाबत ते म्हणाले की, अमृत कालच्या दरम्यान, मी अधिवेशनादरम्यान विधिमंडळ कामकाज आणि इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यास उत्सुक आहे. या अधिवेशनात आचार समितीची रिपोर्टही मांडली जाईल. समितीने मोईत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्याची शिफारस केली आहे.