22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूरमहिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी तरुण निर्दोष

महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी तरुण निर्दोष

सोलापूर :महिलेस लॉजवर नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी शाहरुख आयुब शेख वय 24 राहणार सिद्धेश्वर पेठ सोलापूर यास प्रमुख जिल्हा न्यायाधीश सलमान आजमी यांनी निर्दोष मुक्तता केली.
यात हकीकत अशी की रामवाडी येथील महिलेचा तिच्या पतीसोबत फारकत झाली होती त्यानंतर ती माहेरी राहू लागली त्यावेळी आरोपी शाहरुख हा तिला फोन करीत असे .

त्यांचेत सहा ते सात महिने फोनवर बोलणे चालू होते. दिनांक २५ डीसेंबर २०१७ रोजी आरोपी शाहरुखने तीस रेल्वे स्टेशन येथे बोलावून घेऊन एसटी स्टँड जवळील एका लॉजवर घेऊन जाऊन तिचे वरती अत्याचार केला. अशा आशयाची फिर्याद पीडितेने १ मार्च २०१८ रोजी पोलीस ठाण्यात दिली त्यावरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले होते.

खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस आरोपीचे वकील मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तीवादात पीडिता व आरोपी हे संमतीने लॉज मध्ये गेल्याचे दिसून येते त्यामुळे अत्याचार झाल्याची शक्यता नाही असा युक्तिवाद केला त्यावरून न्यायाधीशांनी आरोपी ची निर्दोष मुक्तता केली .यात आरोपीतर्फे ऍडव्होकेट मिलिंद थोबडे अडवोकेट विनोद सूर्यवंशी ऍडव्होकेट दत्ता गुंड तर सरकारतर्फे एडवोकेट आनंद कुर्डूकर यांनी काम पाहिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR