16.3 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeराष्ट्रीययुवक काँग्रेसच्या वाहनांवर झाला हल्ला

युवक काँग्रेसच्या वाहनांवर झाला हल्ला

लखीमपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा सातवा दिवस सुरू झाला आहे. शनिवारी आपल्या दौ-याच्या सातव्या दिवशी राहुल गांधी आसाममधील लखीमपूर येथे पोहोचले, जिथे दुर्गा मातेचे मंदिर आहे. मातेसमोर नतमस्तक होऊन ते पुढच्या प्रवासाला निघाले. याच दरम्यान राहुल गांधी यांनी अनेक प्रतिनिधींची भेट घेतली.

काँग्रेसने याबाबत एक ट्विट केले आहे. आसामचे भाजपा सरकार मजुरांच्या हिताचा विचार न करता चहाच्या बागा खासगी मालकांना विकत आहेत असे म्हटले. काँग्रेसने आरोप केला की, आदिवासी बेल्ट आणि ब्लॉक्ससारख्या काही समुदायांना दिलेला विशेष दर्जा सरकारने रद्द केला आहे. या राज्यात धार्मिक राजकारणाच्या नावाखाली लोकांवर हल्ले वाढत आहेत. येथे मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे. आज आसाममधील लोकांना पूर्णपणे असुरक्षित वाटत आहे.

हल्ल्याला भाजप जबाबदार
आसाममध्ये भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान युवक काँग्रेसच्या वाहनांवर हल्ला झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेसने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री युवक काँग्रेसच्या वाहनांच्या तोडफोडीला भाजप युवा मोर्चा जबाबदार आहे. एक व्हीडीओ समोर आला आहे ज्यामध्ये संपूर्ण घटना कॅप्चर करण्यात आली आहे.

खरगेंच्या फोटोशी छेडछाड
ज्यामध्ये काँग्रेस प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांच्या फोटोशी छेडछाड केली जात आहे. यात्रेपूर्वी लखीमपूरमध्ये राहुल गांधींचे कटआऊट आणि बॅनरही खराब झाले आहेत. काँग्रेस पोलिसांकडे तक्रार करण्याचा आणि भाजपाशी संबंधित गैरप्रकारांना अटक करण्याची मागणी करण्याचा विचार करत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR