लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा परिषदेत प्रशासक राज जावून कारभार पदाधिका-यांच्या हातात गेला आहे. पण जिल्हा परिषदेत अद्याप फारसा बदल झालेला दिसून येत नाही. शुक्रवारी दुपारी १ ते १.३० वाजण्याच्या सुमारास जवळपास ८० टक्के विभाग प्रमुख कार्यालयात अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीच्या या कालावधित त्यांच्या कार्यालयात, अॅन्टी चेंबरमध्ये फॅन, लख्ख प्रकाशाचे विद्यूत दिवे बिनधास्तपणे सुरू होते. ते सुरू असलेले फॅन, विद्यूत दिवे बंद करावे, असे ना कार्यालय प्रमुखांना, ना कार्यालयाच्या शिपायांना कमी पणाचे वाटत असावे. तर शासन दुसरीकडे विज बचत करा म्हणून शासन उगाच बडबड करते की काय असा प्रकार पहायला मिळत आहे. अधिका-यांच्या प्रमाणेच ही बाब पदाधिकारी ना प्रशासन मनावर घेताना दिसून येत नाही.
लातूर जिल्हा परिषदेत मार्च पूर्वी प्रशासक राज होते. या काळात अधिका-यांना जाब विचारनारे कोणीच नव्हते. पण आता जिल्हा परिषदेत पदाधिकारी येऊन सहा महिण्याचा कालावधी उलटून गेला आहे. पण अधिका-यांचे अधिकारी अजून बिनधास्त आहेत. त्यांच्यावर ना पदाधिकारी, ना प्रशासनाचा कोणाचाच वचक राहिला नाही. लातूर जिल्हा परिषदेत शुक्रवारी दुपारी १ ते १.३० वाजण्याच्या सुमारास बांधकाम विभाग प्रमुख, कृषि विभाग प्रमुख, पंचायत विभाग प्रमुख, अर्थ विभाग प्रमुख, आरोग्य विभाग प्रमुख, यांत्रीकी विभाग प्रमुख यांच्या कार्यालयात सर्व विजेचे दिवे, फॅन सुरू होते. त्यांच्या कार्यालयात व अॅन्टी चेंबरमध्येही लख प्रकाशाने कार्यालय उजळून गेले होते. मात्र त्याचा लाभ फक्त वेगवेगळया विभाग प्रमुखांची रिकामी खुर्चीच घेत होती. या सेवा सुविधा ह्या अधिकारी व नागरिकांसाठी असल्या तरी कार्यालयात कोणीच नसताना विजेचा गैर वापर कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतो. तर कांही विभाग प्रमुखांच्या कार्यालयात एखादा दुसरा विद्यूत दिवे सुरू होते. सदर विजेवर होणारा खर्च जनतेच्या खिशातूनच होतो याचे अधिकारी व पदाधिका-यांनी भान ठेवणे गरजेचे आहे.
















