25.7 C
Latur
Monday, February 3, 2025
Homeमहाराष्ट्रउद्या मुंडेंविरोधात पुरावे मांडणार : अंजली दमानिया

उद्या मुंडेंविरोधात पुरावे मांडणार : अंजली दमानिया

बीड : प्रतिनिधी
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी विरोधकांकडून सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट अजित पवारांची भेट घेऊन त्यांना मुंडेंविरोधात काही पुरावे सादर केले आहेत. मात्र त्यानंतरही कारवाई होत नसल्याचं पाहून आता अंजली दमानियांनी मंगळवारी मोठा गौप्यस्फोट करण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, बीड सरपंच हत्या प्रकरण आता थेट धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदापर्यंत पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्याशी संबंध असल्याच्या मुद्यावरून सध्या धनंजय मुंडे चर्चेचा विषय ठरले आहेत.

अंजली दमानियांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर आज सकाळी केलेल्या पोस्टमध्ये उद्या म्हणजेच मंगळवारी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं नमूद केले आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता माझ्या घरून पत्रकार परिषद घेणार आहे. हे भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल, अशी अपेक्षा. गेले चार दिवस मी त्याच्यावर काम केले आहे , असे अंजली दमानियांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

‘मुंडे फडणवीस, अजित पवारांचे मित्र
दरम्यान, धनंजय मुंडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मित्र असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा उल्लेख अंजली दमानियांनी केला. सगळ्यांवरच खूप मोठा दबाव आहे. मी हे प्रकरण का लावून धरतेय? कारण जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल असं मला वाटत नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR