सोलापूर: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी दि. २१ एप्रिल रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येणार होते. मात्र हा दौरा रद्द झाल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव नितीन दळवी यांनी या बाबतचे पत्र सोलापूरच्या निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवले आहे. काही अपरिहार्य कारणामुळे हा दौरा रद्द केल्याचे पत्रात म्हटले आहे.