एमपीएससी पूर्वपरीक्षा पुढे ढकलली

२५ ऑक्टोबरऐवजी आता ३ जानेवारीला होणार परीक्षा
मुंबई : प्रतिनिधी
स्पर्धा परीक्षेत होणारा गोंधळ, परीक्षेच्या आयोजनातून समोर येणारा ढिसाळ कारभार या सर्व प्रकारामुळे राज्यभरातील विद्यार्थी आंदोलन करत आहेत. गेल्या काही दिवसांत परीक्षेतील कथिक पेपरफुटीची प्रकरणे समोर आल्याने एमपीएससीच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, एकीकडे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असतानाच एमपीएससीने आज परिपत्रक काढत गट क २०२६ ची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे.

एमपीएससीने आज परिपत्रक जारी केले असून, त्यानुसार गट क २०२६ ची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा २५ ऑक्टोबर रोजी होणार होती. परंतु ही परीक्षा तीन महिने पुढे ढकलण्यात आली आहे. नव्या परिपत्रकानुसार ही परीक्षा ३ जानेवारी २०२७ रोजी होणार आहे.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी पुण्यात आक्रमक झाले. त्यांनी एकत्र येऊन एमपीएससीच्या कारभाराविरोधात आंदोलन केले. या आंदोलनात आमदार रोहित पवार यांनीदेखील सहभाग नोंदवला. त्यांनी विद्यमान एमपीएससी अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला. त्यांनी काहीही झाले तरी एमपीएससीच्या विद्यमान अध्यक्षांना हटवावे. त्याऐवजी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासारख्या तडफदार अधिका-याला नियुक्त करावे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. विरोधकांनी हा मुद्दा लावून धरल्याने सरकारला सावध पवित्रा घ्यावा लागत आहे.

३ महिन्यांनंतर होणार परीक्षा
भविष्यात कधीही पेपरफुटी होणार नाही, भरती प्रक्रियेत पारदर्शकता राहील, यासाठी योग्य पावले उचलली जातील, असे सरकारने सांगितले आहे. असे असतानाच आता एमपीएससीने गट क २०२६ ची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली. आता ही परीक्षा साधारण तीन महिन्यांनी होणार आहे.

गुणांच्या फेरपडताळणीची संधी
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ च्या गुणांमधील प्रचंड तफावतीबाबत विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उमेदवारांना गुणांच्या फेरपडताळणीची संधी उपलब्ध करून दिली आहे. इच्छुक उमेदवारांना आयोगाने निश्चित केलेल्या ऑनलाईन प्रक्रियेद्वारे १० सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
22:40
Video thumbnail
Dharashiv|उमरग्यात मराठा आंदोलकांचा उद्रेक! तहसीलदारांची खुर्ची पेटवली; 4 जण ताब्यात
02:51
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये पावसाने ओढ दिली! कोरडा दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रवादीची मोठी मागणी
02:05
Video thumbnail
Latur|लातूरच्या सदानंद विद्यालयात ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा आरोप!
05:05
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये नाभिक समाजाचा गौरव सोहळा; जिल्हाभरातून समाजबांधवांची उपस्थिती
02:27
Video thumbnail
Latur|‘तुम से ना हो पायेगा’! अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल; लातूरमध्ये शिवसेनेचं आंदोलन
07:57
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्याने मराठा आंदोलक संतप्त; हदगावमध्ये बॅनर फाडले
00:33
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्यानंतर आंदोलनाची धार वाढली? बरडशेवाळ्यात मराठा समाजाचा रास्ता रोको
00:33
Video thumbnail
Nanded|उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवला! पावसाअभावी नांदेडच्या शेतकऱ्याची हतबलता
02:06
Video thumbnail
Nanded|मराठवाड्याचा मुक्ती संग्राम पाठ्यपुस्तकात घ्या! नांदेडमधून शासनाकडे मोठी मागणी
03:26
Video thumbnail
Latur|हातातोंडाशी आलेला घास गेला! लातूरमध्ये पाण्याअभावी उभी पिकं करपली
03:42
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
07:57
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
10:46
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
19:02
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
16:29

Latest news