भाजपा सत्ताधा-यांनो ‘तुमसे ना हो पायेगा…’ पायउतार व्हा

लातूर : प्रतिनिधी
भाजपा सरकारकडून मराठवाडा तसेच लातूर जिल्हा विकासाच्या फक्त थापाच का…लातूरकरांना उजनीचे पाणी कधी मिळणार, पाण्याच्या प्रश्नावर आजपर्यंत किती घोषणा, लातूरचे सोयाबीन प्रक्रिया व संशोधन केंद्र कुठे गेले, राष्ट्रीय महामार्ग ६३ बोरगाव काळे-मुरुड व महामार्ग ५४८-ब आणि ३६१ पानगाव याचे काय?, विमानतळ विस्तारीकरण  किती दिवस रखडणार, रेल्वे बोगी कारखान्यामुळे स्थानिकांची किती बेरोजगारी कमी झाली, कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प व कोल्हापूरी बंधारे, साठवण तलावाचे काय?… काहींही नाही. त्यामुळे सत्ताधा-यांनो ‘तुमसे ना हो पायेगा…’ त्यामुळे तुम्ही पाय उतार व्हा, अशी टिका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केंद्र व राज्य सरकारवर केली.
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण मराठवाड्यात सूरु असलेल्या ‘तूमसे ना हो पायेगा…’ हे  देशातील आणि राज्यातील भाजपा सरकारच्या निष्क्रीयेतीच्या निषेधार्थ आंदोलन सुरु आहे. दि. ९ सप्टेंबर रोजी अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली लातूर शहरातील महात्मा गांधी चौकात ‘तूमसे ना हो पायेगा…’ हे आंदोलन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी धाराशिवचे आमदार कैलास पाटील, उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी, जिल्हा संपर्क प्रमुख रोहिदास चव्हाण, जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी, जिल्हा समन्वयक पप्पू कुलकर्णी, महिला जिल्हा संघटिका डॉ. शोभा बेंजरगे, जिल्हा संघटिका जयश्री उटगे, उपजिल्हा प्रमुख बालाजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकारने मराठवाड्याच्या विकासासाठी आजपर्यंत ज्या घोषणा केल्या. त्यात केवळ दीड टक्का प्रगती आहे, असा आरोप करीत अंबादास दानवे पुढे बोलताना म्हणाले, सिंचनाच्या बाबतीत मराठवाडा खुप मागे आहे. लातूर जिल्हा गोदावरी खो-यात येते. लातूर जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर लातूरला कधीच उजनीचे पाणी आणणे शक्य होणार नाही. हे वास्तव असताना भाजपा सरकारने आजपर्यंत कितीवेळा उजनीच्या पाण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणेच मराठवाड्याच्या विकासाच्या घोषणाच घोषणा या सरकारने केल्या मात्र, त्या घोषणांची अंमलबजावणीच झाली नाही. त्यामुळे भाजपा सरकार हे घोषणाबाज सरकार आहे.
यावेळी आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वमाी, रोहिदास चव्हाण, बालाजी रेड्डी, पप्पू कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करताना केंद्र व राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. या आंदोलनात बजरंग जाधव, बाळासाहेब डोंगरे, भारत सांगवेकर, कैलास पाटील, अ‍ॅड. राहूली मातोळकर, लक्ष्मण पेठकर, दिनेश जावळे, विष्णूपंत साठे, तानाजी जाधव, त्र्यंबक स्वामी, शंकर रांजनकर, अविनाश रेश्मे, भागवत वंगे, मुकेश सुडे, दत्ता हेंगणे, नीलेश मद्रेवार, प्रशांत मोरे, परमेश्वर सूर्यवंशी, ज्ञानेश्वर मुसळे, माधव कलमुकले, शिवराज मुळगावकर, शिवा कासले, सुनील नाईकवाडे, बालाजी सोनाळे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
22:40
Video thumbnail
Dharashiv|उमरग्यात मराठा आंदोलकांचा उद्रेक! तहसीलदारांची खुर्ची पेटवली; 4 जण ताब्यात
02:51
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये पावसाने ओढ दिली! कोरडा दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रवादीची मोठी मागणी
02:05
Video thumbnail
Latur|लातूरच्या सदानंद विद्यालयात ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा आरोप!
05:05
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये नाभिक समाजाचा गौरव सोहळा; जिल्हाभरातून समाजबांधवांची उपस्थिती
02:27
Video thumbnail
Latur|‘तुम से ना हो पायेगा’! अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल; लातूरमध्ये शिवसेनेचं आंदोलन
07:57
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्याने मराठा आंदोलक संतप्त; हदगावमध्ये बॅनर फाडले
00:33
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्यानंतर आंदोलनाची धार वाढली? बरडशेवाळ्यात मराठा समाजाचा रास्ता रोको
00:33
Video thumbnail
Nanded|उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवला! पावसाअभावी नांदेडच्या शेतकऱ्याची हतबलता
02:06
Video thumbnail
Nanded|मराठवाड्याचा मुक्ती संग्राम पाठ्यपुस्तकात घ्या! नांदेडमधून शासनाकडे मोठी मागणी
03:26
Video thumbnail
Latur|हातातोंडाशी आलेला घास गेला! लातूरमध्ये पाण्याअभावी उभी पिकं करपली
03:42
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
07:57
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
10:46
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
19:02
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
16:29

Latest news