औसा : प्रतिनिधी
औसा तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात ओला दुष्काळची गडद छाया पसरली असून लातूर जिल्हा काँग्रेस पार्टीतर्फे दुष्काळ व्यवस्थापन व मदत केंद्र नावाने एक जिल्हा स्तरावरून समितीची स्थापना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार करण्यात आली आहे. त्यामध्ये शरद देशमुख हे अध्यक्ष असून त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व महसूल मंडळांना एक निरीक्षक नेमणूक करण्यात आला असून हा निरीक्षक प्रत्येक महसूल मंडळातील प्रत्येक गावात भेट देऊन प्रत्यक्ष शेतावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करतील.
आजपर्यंत राज्यांमध्ये कोणत्याही जिल्ह्यात कोणत्याही पक्षांने या प्रकारची यंत्रणा उभी केली नव्हती ती यंत्रणा लातूर जिल्हा काँग्रेसने उभी केली असून प्रत्यक्षात बांधावर जाऊन शासनाची मदत मिळत नाही तोपर्यंत आम्ही वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे संघर्ष करण्याची भूमिका घेतली असून माध्यमांच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो. की, जोपर्यंत शेतकरी यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभे करण्यात येईल, असा इशारा साळुंके यांनी दिला. साळुंखे म्हणाले की, शेतक-यांच्या उभ्या पिकाला पाणी लागून मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने शेतक-यांना एक लाख रुपये प्रति एकर तर फळबागेला दीड लाख रुपये मदत दिली तर संकटात सापडलेल्या दिली तरच शेतकरी संकटातून उभा राहू शकेल. त्यामुळे शेतक-यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही रचनात्मक संघर्ष व मोर्चे काढून न्याय मिळवून देणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे औसा विधानसभा काँग्रेस पक्ष प्रभारी डॉ.श्रावण रॅपनवाड, प्रदेश सचिव श्रीशैल्य उटगे, श्रीमती विद्या पाटील, प्र्रदेश काँग्रेस सरचिटणीस अमर खानापुरे, औसा तालुकाध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी महिला तालुकाध्यक्ष सईताई गोरे, शहराध्यक्ष अझर हाश्मी, कार्याध्यक्ष खुनमीर मुल्ला मारुती महाराज साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सचीन पाटील, माजी चेअरमन गणपतराव बाजुळगे, अॅड बाबासाहेब गायकवाड, अमरसिंह भोसले, नारायणराव लोखंडे, ज्ञानोबा जोगदंड, यशवंत चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते .
















