परभणी : शहरातील खंडोबा बाजार परिसरात मागील आठवड्यातील रविवारी पत्नीने २ साथीदारांच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मयताच्या पत्नीसह २ साथीदारांना ताब्यात घेतले आहे. या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता दि. ८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या घटनेत पोलिसांनी मृत फिरोज खान याची पत्नी जिनत खान हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी जिनत खानने साथीदाराच्या मदतीने पती फिरोजचा खून केल्याचे पुढे आले होते.
स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनात फिरोजच्या पत्नीसह साथीदार शेख रईस शेख युसुफ, अरबाज खान गुलाब खान पठाण या दोघांना हिंगोली येथून ताब्यात घेतले. या प्रकरणात आरोपी पत्नीस देखील पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
















