नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशांच्या सैन्य शक्तीच्या आधारे त्यांची रँकिंग ठरवणारी संस्था ग्लोबल फायर पॉवरने २०२५ साठी एक नवी यादी जारी केली आहे. या यादीत जगभरातील सर्व देशांचे रँकिंग निश्चित केले जाते. मात्र या वेळच्या रँकिंगमध्ये पाकिस्तानला झटका बसला आहे.
ग्लोबल फायरपॉवरच्या २०२४ च्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर होता. ही रँकिंग भारताने कायम ठेवली असून २०२५ च्या यादीतही भारत चौथ्या क्रमांकावर आहे. मात्र, पाकिस्तानची स्थिती पूर्वीच्या तुलनेत प्रचंड खराब झाली आहे. पाकिस्तान २०२४ च्या यादीत जगातील पॉवरफूल देशांमध्ये ९ व्या स्थानावर होता. जो २०२५ मध्ये घसरून १२ व्या क्रमांकावर गेला आहे. तसेच या यादीत पहिल्या क्रमांकावर अमेरिका, दुस-या क्रमांकावर रशिया तर तिस-या क्रमांकावर चीन आहे.
२०२५ चे टॉप-१० पॉवरफूल देश –
अमेरिका : अत्याधुनिक क्षमता, आर्थिक ताकद, जागतिक प्रभाव यांमुळे अमेरिका सर्वोच्च स्थानावर बसलेली आहे. तिचा पॉवर इंडेक्स स्कोर ०.०७४४ एवढा आहे.
रशिया : युक्रेनसोबत युद्ध सुरू असतानाही, ईराण, उत्तर कोरिया आणि चीन सोबतच्या रणनीतिक संबंधांमुळे रशिया मजबूत स्थितीत आहे. रशियाचा पॉवर इंडेक्स स्कोर ०.०७८८ एवढा आहे.
चीन : संरक्षण आणि तांत्रिक गुंतवणूकीत मोठी वाढ केल्याने चीन टॉप ३ मध्ये आहे. चीनचा पॉवर इंडेक्स स्कोर ०.०७८८ आहे.
भारत : प्रगत लष्करी उपकरणे, आधुनिक शस्त्रे आणि रणनीतिक स्थितीमुळे भारताच्या लष्करी क्षमतेत लक्षणीय वाढ झाली. भारताचा पॉवर इंडेक्स स्कोअर ०.११८४ एवढा आहे.
दक्षिण कोरिया : संरक्षण क्षेत्रातील मोठी गुंतवणूक आणि जागतिक भागीदारी, यामुळे दक्षिण कोरियाचा समावेश टॉप-५ देशांमध्ये होतो. त्यांचा पॉवर इंडेक्स ०.१६५६ आहे.
यानंतर, यूके (पॉवर इंडेक्स स्कोर ०.१७८५), फ्रान्स (०.१८७८), जपान (०.१८३९), टर्की (०.१९०२), इटली (०.२१६४).