Homeलातूरजीवनाच्या अंतिम क्षणी ‘सीपीआर’ उपचार महत्त्वाचे 

जीवनाच्या अंतिम क्षणी ‘सीपीआर’ उपचार महत्त्वाचे 

लातूर : प्रतिनिधी
योग्य पद्धतीने सीपीआर  देवुन केवळ डॉक्टर, परिचारिकाच नव्हे तर सर्व सामान्य माणुससुद्धा एखाद्याचे जीव वाचवू शकतो. जीवनाच्या अंतिमक्षणी सीपीआर उपचार महत्वाचे ठरते, असे प्रतिपादन फिजिशियन  डॉ. हमीद चौधरी यांनी केले.  येथील लातूर अतिदक्षतमार्फत जीवनाशी निगडित उपचाराविषयी म्हणजेच सीपीआर व ईसीजी या विषयावर येथील डॉ. भालचंद्र रक्तपेढीच्या सभागृहात कार्यशाळा झाली. त्यावेळी डॉ. हमीद चौधरी बोलत होते. या कार्यशाळेत लातूर व परिसरातील वैद्यकीय अधिकारी, जनरल प्रॅक्टिशनर्स व परिचारिकांना सीपीआर व इसीजी ज्ञान व प्रात्यक्षिकद्वारे प्रशिक्षण देण्यात आले प्रशिक्षण दोन सत्रात घेण्यात आले. सकाळच्या सत्रात  जवळपास दीडशे परिचारिकांना फिजिशियन  डॉ. हमीद चौधरी, फिजिशियन डॉ. सुनिता पाटील यांनी प्रशिक्षण दिले.
संध्याकाळचे सत्रामध्ये  वैद्यकीय अधिकारी व जनरल प्रॅक्टिशनर्स यांना सीपीआर व ईसीजी या अति महत्वाच्या  विषयावर डॉ. हमीद चौधरी, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. दीपक कटारे, डॉ.सुनिता पाटील तसेच डॉ. सदफ चौधरी यांनी मार्गदर्शन  केले. प्रशिक्षणाचे उद्घाटन आयएमए अध्यक्ष डॉ. अभय कदम व डॉ. चंद्रकांत शिरोळे यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे डीन एमआयटी डॉ. नवाब  जमादार, डॉ. मन्मथआप्पा भातांबरे, डॉ. सूर्यकांत  निसाले, डॉ. प्रदीप ढेले, डॉ. मोहिनी गानू, डॉ. ज्योती सूळ, डॉ. एकनाथ माले, डॉ. रमेश भराटे, डॉ. बालाजी साळुंखे, डॉ. बाळासाहेब जाधव, डॉ. अशोक सारडा, डॉ. संतोष हिंदोळे, अमृता पोहरे, लक्ष्मी आपटे, सुमित्रा तोटे,  अश्विनी बेले, अरुण कदम  इत्यादी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सूत्रसंचालन डॉ. परमेश्वर सूर्यवंशी, डॉ. गायत्री सोलंकी, राजश्री पवार यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR