जेईई अ‍ॅडव्हान्स-२०२६ परीक्षेत शाहू महाविद्यालयाचे घवघवीत यश

लातूर : प्रतिनिधी
जेईई-अडव्हान्स-२०२६ परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या परीक्षेत राजर्षी शाहू ज्युनिअर सायन्स कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले आहे. संस्थेतील पीसीएम ग्रुपचे २०५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. प्राप्त निकालापैकी ५० विद्यार्थ्यांनी (एआयआर) ऑल इंडिया रँक प्राप्त केले
आहेत.
आयआयटी, आयआयएसटी, आयआयएससी, आयआययसईआर इत्यादी  राष्ट्रीय पातळीवरील महाविद्यालयात प्रवेशासाठी जेईई-अडव्हान्स-२०२६ ऑनलाईन (सीबीटी) परीक्षा १७ मे २०२५ रोजी दोन सत्रात देशात एकाचवेळी घेण्यात आली. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार या महाविद्यालयातून वास्तवसिंह नारायणराव वडणे कॉमन रँक लिस्टमध्ये ३०९१ रँक व आर्थिक दुर्बल घटकामधून ३५७ रँक घेऊन प्रथम क्रमांक मिळवला आहे.
तनिष्का उमेश इंगळे ही (सीआरएल) ४५४५ व अनुसूचित जाती संवर्गातून (सीआरएल) एस्सी रँक ८७ व महाविद्यालयातील मुलीतून सर्वप्रथम, कृष्णा विष्णू घोडके (सीआरएल) ४९००६ व आर्थिक दुर्बल घटकामधून इडब्ल्यूएस रँक लिस्ट ५८२, अंतरिक्ष बालू जाधव (सीआरएल) ५२१७ व  इतर मागास संवर्गातून ओबीसी-एनसीएल रँक लिस्ट ११३८ रँक प्राप्त करून महाविद्यालयातून प्रथम आला आहे. दिव्यांग संवर्गातून सत्यजित विलास शिंदे या विद्यार्थ्याने ३१६ रँक प्राप्त केला आहे. यावर्षी महाविद्यालयातून जवळपास ३६ विद्यार्थ्यांना भारतातील प्रख्यात आयआयटी व २८ विद्यार्थ्यांना एनआयटी, आयसर व बिटस् या महाविद्यालयामध्ये हमखास प्रवेश मिळू  शकतो.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व सीईटी-सेल शालेय समिती अध्यक्ष डॉ. अजय जाधव, सचिव बी. बी. ठोंबरे, सहसचिव डॉ. शिवाजीराव सुर्यवंशी, सहसचिव उद्धवराव पाटील व इतर सर्व संचालक, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, सीईटी-सेलचे संचालक प्रा. दिलीप देशमुख, मुख्य-समन्वयक प्रा. स्वप्निल राजेमाने, समन्वयक सुरेश तांबडे, व आयआयटी बॅचचे समन्वयक प्रा. अभयसिंह देशमुख, इतर सर्व समन्वयक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
भाडेकरार मोडून शेतकऱ्यांची फसवणूक; 'टी.एस. विंड पॉवर' कंपनीच्या विरोधात तहसीलसमोर आमरण उपोषण
02:14
Video thumbnail
लातूर-बार्शी रोडवरील 'मोटेगावकर' यांचा कोट्यवधींचा प्लॉट चर्चेत; सीबीआयच्या रडारवर बेनामी मालमत्ता?
03:12
Video thumbnail
पीक विम्याचा घोळ: शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा; जिल्हा कृषी अधीक्षकांना जमिनीवर बसवून केले आंदोलन
04:25
Video thumbnail
धाराशिव-बीड-लातूर विधान परिषद निवडणूक: बसवराज पाटील आणि महेश देशमुख यांच्यात थेट लढत; अर्ज दाखल
02:06
Video thumbnail
अमर राजूरकर यांचा भाजप कडून उमेदवारी अर्ज दाखल; ३०० पार मतांचा विश्वास
06:35
Video thumbnail
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद लाइव्ह
16:58
Video thumbnail
नांदेड जिल्ह्यात वादळी पावसासह अर्धापुरात गारपीट; उद्याही 'येलो अलर्ट' कायम
01:34
Video thumbnail
Latur|राजमाता अहिल्यादेवींचे विचार घराघरात पोहोचले पाहिजेत : दिलीपराव देशमुख
05:50
Video thumbnail
Latur|लातूर रेल्वे स्थानकाच्या विकासाला वेग; बहुप्रतीक्षित पिटलाईन डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार
02:27
Video thumbnail
Nanded|तारण ठेवलेल्या सोन्यावरच बँक अधिकाऱ्यांचा डल्ला; SBI मधील 85 लाखांचा घोटाळा उघड
03:58
Video thumbnail
Latur|लातुरात अहिल्यादेवी जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
04:21
Video thumbnail
मास्टर ब्लास्टरचा पाककौशल्य 'सिक्सर'; सचिन तेंडुलकरने बनवले खास उकडीचे मोदक
00:40
Video thumbnail
थिएटरच्या स्क्रीनमधून थेट स्कॉर्पिओ बाहेर! व्हिडिओ पाहून प्रेक्षकांची धांदल
00:18
Video thumbnail
अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याची दृश्ये कॅमेऱ्यात कैद; पहा 'क्लिअर' व्हिडिओ
00:30
Video thumbnail
मराठा आरक्षण आंदोलन; सरकारच्या सकारात्मक भूमिकेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतले उपोषण
00:56

Latest news