झरी : धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) चे जात प्रमाणपत्र वितरित करण्याच्या आदेशाबाबत शासननिर्णय काढण्याच्या अनुषंगाने व पंढरपूर, लातुर व नेवासा या ठिकाणी सुरू असलेल्या आमरण उपोषणातील मागण्या मंजूर कराव्यात यासाठी दि.२३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता सकल धनगर समाजाच्या वतीने झरी येथे अहिल्यादेवी होळकर चौकात रास्तारोको आंदोलन करून नायब तहसीलदार गणेश चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर दत्तराव जगाडे, राधाजी परधे, कुंडीक पांढरे, अशोक जगाडे, भास्कर जगाडे, संदिप बोरकर, अनंता मुळे, बालासाहेब बकान, नारायण जगाडे, रामभाऊ हांडगे, दिनेश बीरगळ, विष्णू नाना जगाडे, बालाजी जगाडे, तुळशीराम माटे, काशिनाथ जगाडे, बाळासाहेब जगाडे, दत्ता जगाडे, यशवंत जगाडे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.
या आंदोलनात झरी, पिंपळा, जलालपूर, मांडवा टाकळी, नांदापूर येथील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठ्या रांगा पहावयास मिळाल्या. आंदोलकांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. सपोनि. हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.