जळकोट तालुक्यातील ढोर सांगवी येथील युवा शेतकरी नरेश अशोक पाटील (वय २८) हे पोळ्याच्या निमित्ताने आपल्या शेतीजवळील नदीत बैलाला धूत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे ते बैलासकट वाहून गेले. बैल मात्र सुखरूप बाहेर निघाले ही घटना दुपारी १ च्या सुमारास घडली. त्यांचा शोध गावकरी दुपारी २ वाजल्यापासून घेत होते मात्र नरेशचा मृतदेह आढळून आला नाही .
१ सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना मोठा पूर आला आहे. पोळ्याच्या एक दिवस अगोदर खांड मळण्या दिवशी शेतकरी नरेश अशोक पाटील हे बैल्यांना पोहणी घालत पाण्याचा प्रवाह वाढला. यात नरेश पाटील हे पाण्याबरोबर वाहून गेले. बैल मात्र पोहून बाहेर आले. नरेश पाटील यांना पोहता येत नसल्यामुळे ते पाण्याच्या प्रवाहासोबत पुढे वाहून गेले. असा ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. सोनवळा येथील साठवण तलावामध्ये शोध घेतला जात आहे .
शेतकरी नरेश पाटील हे बैल धुण्यासाठी जातो म्हणून सकाळी शेतीकडे गेले होते पंरतू दुपारी दोन पर्यंत ते घरी आलेच नाहीत त्यांचा फोन देखील लागत नव्हता यावेळी घरची मंडळी शेतीकडे गेली असता शेतामध्ये नदीच्या दुस-या बाजूला बैल दिसून आले मात्र नरेश काही दिसून आले नाहीत. गावातील जवळपास १०० नागरिक नदीच्या दोन्ही बाजूला नरेश पाटलांचा शोध घेत होते परंतू रात्री उशिरापर्यंत शोध लागला नव्हता. नरेश हा त्यांच्या आई-वडिलांना एकुलता एक मुलगा आहे . दरम्यान या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मंडळ अधिकारी कमलाकर पन्हाळे यांनी भेट दिली. रात्री अंधार झाल्यामुळे तसेच मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे ग्रामस्थांनाही शोध मोहीम थांबवावी लागली .