तावरजा मध्यम प्रकल्पातून सिंचनासाठी तातडीने पाणी सोडा

लातूर : प्रतिनिधी
दिवसेंदिवस तापमान वाढत असल्याने विहिरी कोरड्या पडत आहेत. त्यामुळे ऊस, फळबागा, भाजीपाला आणि अन्य शेतीपिके जगवायची कशी, असा प्रश्न शेतक-यांसमोर उभा ठाकला आहे. शेतक-यांवर ओढवलेल्या या परिस्थितीची तातडीने दखल घेत लातूर ग्रामीणचे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना पत्र पाठवून तावरजा मध्यम प्रकल्पातून सिंचनासाठी त्वरीत पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
तावरजा मध्यम प्रकल्प हा परिसरातील शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पावर तावरजा व लगतच्या गावांचे सिंचन क्षेत्र अवलंबून आहे. सद्यस्थितीत कालव्याच्या दुरुस्तीअभावी सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार नसल्याचे प्रशासनाकडून शेतक-यांना सांगण्यात येत आहे. मात्र धरणामध्ये पाणी असतानाही पाण्याअभावी शेतातील पिके वाळून जात आहेत. त्यामुळे शेतक-यांचे मोठे  नुकसान होत आहे. पशुधनासाठीही पाणी उपलब्ध नसल्याने शेतक-यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत परिसरातील अनेक शेतक-यांनी माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. याची तातडीने दखल घेत माजी आमदार धिरज देशमुख यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवून सद्यस्थितीकडे लक्ष वेधले. पाण्याअभावी शेतक-यांचे अतोनात नुकसान होत आहे. पिके करपून जात आहेत. पशुधनासाठी सुद्धा पाणी उपलब्ध नाही. शेतकरी बांधव मोठ्या संकटात सापडले असल्याने तात्काळ कालव्याद्वारे सिंचनासाठी पाणी सोडण्यात यावे, असे पत्रात नमूद केले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पर्यावरण संरक्षण कायदा ठरतोय कुचकामी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वातावरण गढूळ...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Parbhani|'ही कर्जमाफी नाही, कर्जवसुली योजना!' – रोहित पवारांचा सरकारवर घणाघात
10:08
Video thumbnail
Karmala|खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
00:53
Video thumbnail
BREAKING : लातूर जिल्ह्यासाठी ४८४ कोटींचा विकास आराखडा मंजूर;DPDC बैठकीत महत्त्वाचे निर्णय
06:19
Video thumbnail
Latur|दोन दिवसांच्या पावसानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत; पण कृषी विभागाचा मोठा इशारा!
02:54
Video thumbnail
BREAKING| ड्रेनेजच्या नावाखाली खोदलेले रस्ते ठरले जीवघेणे!; नारायण नगरात अपघातांचा धोका वाढला
05:30
Video thumbnail
कायदा-सुव्यवस्थेलाच खुलेआम आव्हान...किल्लारीत पोलिसांनाच जिवे मारण्याची धमकी‌ #breakingnews #marathi
00:39
Video thumbnail
LIVE-लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची पत्रकार परिषद लाईव्ह
09:27
Video thumbnail
LIVE-लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची पत्रकार परिषद लाईव्ह
00:00
Video thumbnail
BREAKING : जळकोट तालुक्यात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीत लाखोंचा घोटाळा उघड
01:03
Video thumbnail
मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला साडी-चोळी आणि बांगड्या; तुळजापुरात संतप्त महिलांकडून अनोखा निषेध
02:30
Video thumbnail
पालखी मार्ग, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा वेळेत पूर्ण करा; जि प सभेत विविध विभागांना समन्वयाचे आदेश
07:01
Video thumbnail
Rohit Pawar|लातुरातून रोहित पवारांचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल
07:29
Video thumbnail
Parbhani|परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात अचानक आग; BLO बैठकीत उडाली धावपळ
02:56
Video thumbnail
BREAKING : लातूर शहरासह जिल्हाभरात पावसाची दमदार सुरुवात
02:07
Video thumbnail
Latur|मुरुडला नगरपंचायत दर्जा द्या; माजी आमदार धीरज देशमुख यांची सरकारकडे मागणी
05:03

Latest news