देशी दारूची वाहतूक करणा-या दोघांना पकडले; दारूसह ४.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त

परभणी : मानवत शहरालगतच्या रामपुरी रोडवर पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धडक कारवाई करत अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणा-या दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत देशी दारूचा साठा व कार असा एकूण ४ लाख १९ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई दि. ८ जून रोजी रात्री ८.५० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, रामपुरी रोडवर पांढ-या रंगाच्या मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर (एमएच ०३ बीसी ६५२६) या कारमधून देशी दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून वाहन अडवले. यावेळी वाहन चालक बैल्ले नितीन रविद्र (वय २४) व विजयकुमार देवेंद्रे पम्परी (वय २१) यांची चौकशी करण्यात आली. या वाहनाची झडती घेतली असता देशी दारूचा साठा आढळून आला. संबंधितांकडे दारू वाहतूक अथवा विक्रीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचे तपासात निष्पन्न झाले.

या प्रकरणी विशेष पथक क्रमांक २ चे पोलिस हवालदार शेख अस्लम इसमाईल शेख यांच्या फिर्यादीवरून मानवत पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अर्जुन टर्वे, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पोलीस हवालदार सय्यद इरशाद, सूर्यकांत ताटीकोंडलवार, यशवंत वाघमारे, अस्लम शेख व वावळे यांच्या पथकाने केली. पुढील तपास मानवत पोलीस करीत आहेत.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
पावसाचा जोर, रुळांवर पाणी; मुंबईच्या दिशेने येणाऱ्या 'वंदे भारत'चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!
00:27
Video thumbnail
पूर्णा-देगाव रस्ता काँक्रीटीकरणाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन
05:37
Video thumbnail
Latur Crime News| कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला जिवंत जाळले!; निर्दयी पतीसह तिघांवर गुन्हा दाखल
04:21
Video thumbnail
Nanded|अपमानाचा बदला घेण्यासाठी व्यापाऱ्याची लूट; LCBचा मोठा खुलासा!
01:59
Video thumbnail
Latur|मांजरा धरणातील पाणी डिसेंबरपर्यंत पुरेल – जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
03:16
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये पावसाचा 'लपंडाव'; शेतकरी हवालदिल
03:08
Video thumbnail
Latur|ढोर सांगवीतील दुर्दैवी घटना; विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू
01:09
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
32:11
Video thumbnail
LIVE | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन 2026 |Maharashtra Assembly Monsoon Session LIVE
01:24:02
Video thumbnail
LIVE- विधानसभा पावसाळी अधिवेशन लाइव्ह प्रेक्षपण
22:03
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये दिवसाढवळ्या फिल्मी स्टाईल चोरी; ४ लाख लंपास
01:07
Video thumbnail
Tukaram Munde LIVE :दूध उद्योगावर मोठी कारवाई? मुंढेंचे स्पष्ट संकेत
00:00
Video thumbnail
Latur|लातूरवर पाणीसंकटाचे सावट; १३५ गावांचा पर्यायी पाणीपुरवठ्यावर आधार
03:21
Video thumbnail
Latur|घोणशी गावात तरुणाचे विद्युत खांबावर चढून आंदोलन
01:02
Video thumbnail
उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे भीषण अपघात: एलपीजी टँकरचा स्फोट होऊन ४ जणांचा मृत्यू
01:51

Latest news