लातूर : प्रतिनिधी
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यास द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन, इंडिया, पुणे यांच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘बेस्ट शुगर फॅक्टरी २०२६’ विशेष पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पंचायत समिती लातूरचे सभापती, उपसभापती व सर्व सदस्य यांच्यावतीने कारखान्याचे चेअरमन, राज्याचे माजी मंत्री व सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा त्यांच्या आशियाना निवासस्थानी पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शे.सह. कारखान्याचे व्हा. चेअरमन अशोक काळे, जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, लातूर पंचायत समितीचे सभापती श्रीकांत बैले, गटनेते गुरूनाथ गवळी, अक्षय देशमुख, बाळासाहेब कदम, विलास उफाडे, अमोल देडे, तसेच बापू चव्हाण, जनक गायकवाड, नामदेव उपाडे, गणेश ढगे, संतोष स्वामी, भास्कर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थितांनी दिलीपराव देशमुख यांचे अभिनंदन करताना सांगितले की, हा पुरस्कार केवळ मांजरा साखर कारखान्याचा नसून संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या सहकार चळवळीचा, ऊस उत्पादक शेतक-यांच्या कष्टाचा आणि आधुनिक व्यवस्थापनाचा गौरव आहे.
















