19.1 C
Latur
Monday, November 18, 2024
Homeमहाराष्ट्रपराभवाच्या भीतीने ‘लाडकी बहीण’ आणली

पराभवाच्या भीतीने ‘लाडकी बहीण’ आणली

सावली : प्रतिनिधी
राज्यात फडणवीस व त्यानंतरच्या घटनाबा खोके सरकारने शेतकरी, शेतमजूर, कामगार, नोकरदार यांचा भ्रमनिरास केला. लोकसभेत फटका बसला म्हणून लाडकी बहीण योजना आणली, पण आता याच योजनेवरून हे भाजपवाले महिला भगिनींना धमकावत आहेत.
भाजप खासदार महाडिक यांनी भर सभेत दीड हजार रुपये घेऊन काँग्रेसच्या मेळाव्यात जाणा-या महिलांवर लक्ष ठेवा, फोटो काढा, असे सांगितले. महायुती सरकार आपल्या खिशातून राज्यातील महिलांना निधी देत नाही. मी तुमच्या सुख-दु:खाचा सदैव साथी आहे. सख्खा जरी नसलो, तरी पक्का भाऊ आहे, असे मत विरोधी पक्षनेते, तथा ब्रह्मपुरीचे विजय वडेट्टीवार यांनी केले.

वडेट्टीवार पुढे म्हणाले, देशातील व राज्यातील हे महापापी सरकार उद्योगपतींचे कर्ज माफ करते, पण शेतक-यांना मात्र देशोधडीला लावत आहे. मोदी सरकार आले, तेव्हा तर पंधरा लाख देऊ, असे आश्वासन दिले. आता १,५०० रुपये दिले आणि गाजावाजा करत आहेत.

ब्रह्मपुरी मतदारसंघातील शेतक-यांसाठी गोसेखुर्द प्रकल्पाचे पाच हजार कोटींचे काम आघाडी सरकार असताना सुरू केले. या प्रकल्पाला निधी मिळावा म्हणून झगडावे लागले, पण यामुळे संपूर्ण क्षेत्रातील ८० टक्के शेती ओलिताखाली आली आहे, तसेच मतदारसंघातील रस्ते, घरकुल योजना, शैक्षणिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांकरिता वसतिगृहे, वाचनालय, गावागावात सामाजिक सभागृहे, शुद्ध पेयजल योजना, क्रीडांगणाचा विकास, आरोग्य व प्रशासकीय सेवेसाठी प्रशस्त इमारती, यासाठी आमदार म्हणून आपल्या कामाचा लेखाजोखा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडला. ब्रह्मपुरीमध्ये मी लोकप्रतिनिधी नाही, तर तुमचा भाऊ म्हणून काम करतो, भगिनींच्या पाठीशी वेळोवेळी उभा राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR