पर्यावरणपूरक गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळेत ३२० विद्यार्थ्यांचा सहभाग

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिका व रोटरॅक्ट क्लब ऑफ लातूर मिड-टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या हेतुने शुक्रवार दि. ११ सप्टेंबर रोजी येथील विलासराव देशमुख पार्क (नाना-नानी पार्क) येथे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली. यात ३२० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले. पर्यावरण संवर्धन,जलप्रदूषण प्रतिबंध व उत्सवामध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा वापर वाढविणे हा कार्यशाळेचा उद्देश होता.यावेळी विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन देण्यात आले. विद्यार्थ्यांनी शाडू मातीच्या मूर्ती तयार करून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यशाळेस महापौर जयश्री सोनकांबळे, उपमहापौर अ‍ॅड. स्नेहल उटगे, आयुक्त राहुल कुलकर्णी, गटनेते विजयकुमार साबदे, अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, उपायुक्त पंजाबराव खानसोळे, उद्यान व अतिक्रमण विभागप्रमुख समाधान सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी श्वेता नागणे, कार्यकारी अभियंता गणेश देवणीकर ,पंडित लोहारे, शहर समन्वयक रोहित पांचाळ यांची उपस्थिती होती. उपायुक्त वसुधा फड, पर्यावरण संवर्धन अधिकारी सन्मती मेस्त्री यांनी कार्यशाळेत सहभागी होऊन विद्यार्थ्यांसोबत शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार केली. विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत प्रोत्साहित केले.
यावेळी रोटरॅक्ट क्लब ऑफ मिडटाऊनचे माजी प्रांतपाल सुधीर लातूरे, लातूरचे सचिव उमेश पत्रावळे, तनिक्षा बोरा रोटरॅक्ट क्लब ऑफ लातूर मिडटाऊन अध्यक्ष, प्रोजेक्ट चेअरपर्सन वेदांत मंदाडे व  आदित्य लातुरे, मंजुषा कुर्डूकर, संगीता लातुरे उपस्थित होत्या. गणेशोत्सवाच्या काळात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण कमी करणे,नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन करणे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना जनमानसात रुजविणे यासाठी लातूर मनपाकडून  जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शाडू मातीच्या गणेशमूर्तींमधून ‘माझा गणपती-पर्यावरणपूरक गणपती’, हा संदेश देण्यात आला. मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी गणेशमूर्ती तयार केल्याने संपूर्ण कार्यशाळेत उत्साहाचे वातावरण लाभले. या संयुक्त उपक्रमातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागरिकांनी शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा स्वीकार करावा आणि पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत सहभागी व्हावे, असा संदेश देण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना महापौर श्रीमती जयश्री सोनकांबळे म्हणाल्या की,गणेशोत्सव साजरा करताना आपण पर्यावरणपूरक दृष्टिकोन स्वीकारावा.नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक साहित्यापासून तयार केलेल्या मूर्तींचा वापर करण्यास आपण प्रोत्साहन देऊ.जलस्रोतांना प्रदूषित करणा-या घातक पदार्थांचा वापर टाळू.आपल्या परंपरांचा सन्मान राखतानाच पर्यावरणाचेही संरक्षण करणारा उत्सव श्री गणेशाला प्रिय आहे,असेही त्या म्हणाल्या.  आयुक्त राहुल कुलकर्णी म्हणाले की, या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.आज पर्यावरणाचे संरक्षण ही  समाजातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी बनवलेली मूर्ती घरीच विसर्जन करून त्या मातीचा उपयोग झाडे लावण्यासाठी करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Sanjay Raut On Manoj jarange|जरांगेंच्या उपोषणावर राऊत संतापले; सरकारला सुनावलं!
12:37
Video thumbnail
Dharashiv|उमरगा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा! शेतकऱ्यांचा सरकारला इशारा
02:40
Video thumbnail
Latur|लातूर ते कोकण थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी! गणेशोत्सवात प्रवाशांची मोठी सोय
03:46
Video thumbnail
BIG BREAKING! राज्यातील १८० तालुके दुष्काळसदृश घोषित | बाबासाहेब पाटलांची मोठी घोषणा
04:00
Video thumbnail
Purna|पूर्णा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक!
01:08
Video thumbnail
Latur|जळकोट तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा! काँग्रेसचा एल्गार; २४ सप्टेंबरला बैलगाडीसह मोर्चा
00:54
Video thumbnail
Latur|जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा; निटूरमध्ये टायर पेटले, महामार्ग ठप्प!
01:17
Video thumbnail
Latur Maratha Protest|मागण्या मान्य करा,नाहीतर मुंबई गाठू! लातूरमध्ये मराठा आंदोलकांचा सरकारला इशारा
01:19
Video thumbnail
Latur|पाऊस गायब, पिकं वाळली अन् बैलपोळाही फिका! लातूरच्या शेतकऱ्यांची काळीज पिळवटून टाकणारी व्यथा
04:49
Video thumbnail
Nanded Accident|नांदेड-भोकर मार्गावर भीषण अपघात! 6 ठार, 8 गंभीर जखमी
00:46
Video thumbnail
Nanded|बैल पोळ्यातही मराठा आरक्षणाची धग! बैलांच्या पाठीवर लिहिले आरक्षणाचे नारे
00:43
Video thumbnail
Latur|स्कॉर्पियो पेटवली अन् आरोपी फरार! कव्हा नाका परिसरात खळबळ
00:42
Video thumbnail
Latur|मराठा आरक्षणासाठी मसलगा येथे मराठा समाजबांधव आक्रमक
01:31
Video thumbnail
Dharashiv|डीजेच्या तालावर बैलांची मिरवणूक; माडजमध्ये बैलपोळ्याचा उत्साह
01:06
Video thumbnail
Nanded|मराठा आरक्षणासाठी टाकीवर आंदोलन; हदगाव तालुक्यात नेमकं काय घडलं?
00:31

Latest news