पुणे : प्रतिनिधी
पुण्यात एका तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करण्यात आले असून धड नदीपात्रात फेकण्यात आले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बदलापूरमध्ये लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुणे शहरातून हत्येचा अतिशय भयानक प्रकार समोर आला आहे. एका तरुणीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे अक्षरश: तुकडे करण्यात आले आहेत. खराडी येथील नदीपात्रात पोलिसांना तरुणीचे धड आढळले आहे. हत्या झालेल्या तरुणीचे वय अंदाजे १८ ते ३० असावे असा अंदाज आहे.
चंदननगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून याप्रकरणी अधिकचा तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे.