पेपर लिक विधेयक राज्यसभेतही मंजूर

विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर कायद्यात रुपांतर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभेनंतर राज्यसभेतही पेपर लिक विरोधी दुरुस्ती विधेयक मंजूर केले. हे विधेयक आता राष्ट्रपतींकडे जाईल आणि त्यांची संमती मिळाल्यानंतर विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह सरकारच्या वतीने विधेयकावर उत्तर देण्यासाठी उभे राहिले, तेव्हा विरोधकांनी सभात्याग केला. यापूर्वी राज्यसभेतील चर्चेदरम्यान जोरदार वाद झाला.

राज्यसेभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल करीत आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या मुद्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी लावून धरली. आरजेडी खासदार मनोज झा यांनी राष्ट्रीय चाचणी संस्था (एनटीए) रद्द करण्याची मागणी केली आणि तिला बंगालच्या उपसागरात फेकून द्यावे, असे म्हटले. या नेत्यांसह इतर सदस्यांनी विधेयकाच्या मुद्यावरून भूमिका ठासून मांडली. सुमारे ८ तास चर्चा आणि वादविवाद झाल्यानंतर पेपर लिक प्रतिबंधक सुधारणा विधेयक राज्यसभेतही मंजूर करण्यात आले.

रात्री सव्वाआठपर्यंत चाललेल्या कामकाजानंतर राज्यसभेचे कामकाज ३१ जुलैपर्यंत तहकूब करण्यात आले. मतदानाच्या वेळी विरोधी पक्ष उपस्थित नव्हता. विरोधी पक्षाचे खासदार जॉन ब्रिटास, ए. ए. रहीम, हरीश बीरन आणि संतोष कुमार यांनी विधेयकातील काही कलमांमध्ये दुरुस्तीसाठी नोटिसा सादर केल्या होत्या. पी. विल्सन आणि तिरुची शिवा यांनी दुरुस्त्या सुचवल्या, ज्या सभागृहात मंजूर होऊ शकल्या नाहीत. हे विधेयक राज्यसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.

गृहमंत्र्यांची अनुपस्थिती,
विरोधकांचा सभात्याग
जेव्हा सभापतींनी जितेंद्र सिंह यांना सरकारची बाजू मांडण्यासाठी बोलावले, तेव्हा विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभात्याग केला. प्रमोद तिवारी म्हणाले की, सर्व विरोधी सदस्यांनी एकच मुद्दा उपस्थित केला आणि चर्चा संपण्यापूर्वी गृहमंत्री सभागृहात परत येतील, अशी अपेक्षा होती. यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी गृहमंत्री, सभागृहात या, अशा घोषणा देत सभात्याग केला.

विश्वासार्हतेच्या दृष्टीने
एक महत्त्वाचे पाऊल
आम्ही संसदेत विधेयक आणले. ते संसदेच्या दोन्ही सभागृहांत दीर्घ चर्चेनंतर कठोर कायदे आणि तरतुदींसह विधेयक मंजूर केले. आता एका विश्वासार्ह परीक्षा प्रणालीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. हे कार्य पुढेही चालू राहील, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदी यांनी एक व्हीडीओ शेअर करीत दिली.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! वर्षभरापूर्वी बांधलेला पूल पुरात तुटला,उमरा–मेट मार्ग बंद; पुरामुळे वाहतूक ठप्प
01:10
Video thumbnail
जळकोट तालुक्यातील तिरु नदीला पूर; पावसाचा जोर कायम राहिल्यास वाहतूक विस्कळीत होण्याचा धोका
00:24
Video thumbnail
जळकोटला मुसळधार पावसाने झोडपले; पुराचा धोका लक्षात घेता प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
02:00
Video thumbnail
Nanded|धक्कादायक! थोड्याशा पावसात रस्ता खचला, कार थेट खड्ड्यात
02:08
Video thumbnail
Latur|जळकोटमध्ये पावसाचा जोर कायम; नदीकाठच्या गावांना अलर्ट!
01:10
Video thumbnail
Latur|लातूरचा 'आंबेडकर चौक' की तळं? थोड्याशा पावसातच रस्ता जलमय!
02:54
Video thumbnail
Latur|अखेर पाऊस धावून आला; वाळणाऱ्या पिकांना मिळालं जीवदान!
02:28
Video thumbnail
Nanded|किनवट-माहूरमध्ये मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा यलो अलर्ट
00:41
Video thumbnail
Nanded|पुलावरून पाणी, तीन गावांचा संपर्क तुटला; नागरिकांचे हाल!
00:35
Video thumbnail
Nanded|अखेर सहस्रकुंड धबधबा प्रवाहित! निसर्गप्रेमींसाठी पर्वणी
00:38
Video thumbnail
Latur|लातूर हादरलं!उड्डाण पुलावरून थेट खाली कोसळले दोन तरुण
02:39
Video thumbnail
Nanded|किनवट हादरलं! पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा १२ तासांनंतरही शोध नाही
01:16
Video thumbnail
Latur|एसटी आरक्षणासाठी धनगर समाज पुन्हा आक्रमक; काळ्या फिती लावून आंदोलन!
01:17
Video thumbnail
Latur|पहिल्याच पावसात मनपाची पोलखोल; नालीचे घाण पाणी थेट रस्त्यावर!
02:22
Video thumbnail
Latur|पाणीपुरवठ्याबाबत चिंता करण्याचे कारण नाही – जिल्हाधिकारी
03:01

Latest news