बीएचएमएस डॉक्टरांच्या मॉडर्न मेडिसीन नोंदणीला आयएमएचा विरोध

लातूर : प्रतिनिधी
होमिओपॅथी (बीएचएमएस) पदवीधर आणि मॉडर्न फार्माकोलॉजीचा कोर्स पूर्ण केलेल्या डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या सरकारच्या विचाराधीन प्रस्तावाला इंडियन मेडिकल असोसिएशन लातूर शाखेने तीव्र विरोध दर्शविला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ लातूर जिल्ह्यातील अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांनी मंगळवार दि. ४ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजल्यापासून २४ तासांचे कामबंद आंदोलन सुरू केले असून ते बुधवार दि. ५ ऑगस्ट रोजी  सकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. आंदोलनाची सुरुवात महात्मा गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांनी सरकारने हा निर्णय घेऊ नये, अशी मागणी करत आंदोलन केले.
टीम आयएमए लातूरच्या वतीने जिल्हाधिका-यांना निवेदन सादर केले. केवळ एक वर्षाचा सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना आधुनिक वैद्यकीय परिषदेत नोंदणी देणे हे आधुनिक वैद्यकशास्त्रातील गुणवत्ता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि व्यावसायिक मानकांसाठी घातक ठरेल. आधुनिक वैद्यकशास्त्राचा सखोल अभ्यास न केलेल्या व्यक्तींना अशा प्रकारची परवानगी दिल्यास रुग्णांच्या सुरक्षेवर आणि सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. या विषयावर आयएमएसह विविध वैद्यकीय संघटनांनी यापूर्वी शासन व मंत्रालयाकडे अनेक वेळा निवेदने, पत्रव्यवहार आणि मागण्या केल्या आहेत.
मात्र प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची पुरेशी दखल घेतली नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. हे आंदोलन रुग्णांच्या विरोधात नसून वैद्यकीय क्षेत्रातील नैतिकता, वैज्ञानिक मानदंड आणि रुग्ण सुरक्षा जपण्यासाठी असल्याचे आयएमएने स्पष्ट केले.  नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रुग्णालयांतील तातडीच्या व आपत्कालीन वैद्यकीय सेवा, अतिदक्षता विभाग, प्रसूती सेवा तसेच इतर अत्यावश्यक आरोग्य सेवा पूर्ववत सुरू ठेवण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Nanded|धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर राकेश टिकैतांचे मोठे वक्तव्य..
01:30
Video thumbnail
Latur|खरीप हंगामावर एल निनोचं सावट; शेतकऱ्यांची नजर आकाशाकडे
02:40
Video thumbnail
Latur|बोगस खत विकणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
04:25
Video thumbnail
Parbhani|परभणी-गंगाखेड महामार्गाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह;202 कोटी खर्च करूनही महामार्गाची दुरवस्था
01:21
Video thumbnail
Nanded|नांदेड हादरलं! दहावीतील विद्यार्थ्याचा वर्गमित्रावर चाकू हल्ला
02:10
Video thumbnail
भूम तालुक्यातील आंबी जयवंतनगर मार्ग बंद;देवगावरोड वरील पूल गेला वाहून,अनेक गावांचा संपर्क तुटला
00:17
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये प्रशासनाचा बुलडोझर; उमर चौक अतिक्रमणमुक्त
01:29
Video thumbnail
Viral Video: सहस्त्रकुंड धबधब्याचा मन मोहून टाकणारा ड्रोन व्ह्यू
01:28
Video thumbnail
Latur|९ ऑगस्टला नांदेडमध्ये शेतकऱ्यांचा महाएल्गार; आंदोलनाची दिशा ठरणार
01:57
Video thumbnail
Latur|भ्रष्टाचाराचा 'अंत' करण्यासाठी शेतकऱ्यांची अंत्ययात्रा! शिरूर अनंतपाळमध्ये अनोखे आंदोलन
01:26
Video thumbnail
Latur|बोगस बियाण्यांवरून रघुनाथदादा पाटील आक्रमक; कृषी कार्यालयात ठिय्या
05:21
Video thumbnail
Latur|जलजीवन मिशनची अपूर्ण कामे; ग्रामस्थांचे 'भिक मांगो' आंदोलन
01:58
Video thumbnail
Latur|पेपरफुटी प्रकरणांवर संभाजी ब्रिगेड आक्रमक; सरकारविरोधात धरणे आंदोलन
04:51
Video thumbnail
Nanded|'नाना पटोले यांना गुरू मानतो'; पाद्यपूजनावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे स्पष्टीकरण
06:36
Video thumbnail
Latur|लातूर LCB ची धडाकेबाज कारवाई; घरफोडी प्रकरणाचा मोठा खुलासा
01:06

Latest news