राज्यात पावसाची विश्रांती; पुन्हा उन्हाच्या झळा

 मुंबई : प्रतिनिधी
जुलैच्या सुरुवातीला राज्यातील काही भागात अतिवृष्टी सदृश्य पाऊस होऊन जुलै महिन्यातील सरासरीहून अधिक पाऊस नोंदला गेला. मात्र, राज्यातील अनेक भाग अजूनही कोरडे आहेत. दरम्यान, जुलै महिन्यात हंगामातील चांगला पाऊस नोंदला जाणे अपेक्षित असते. मात्र, सध्या महाराष्ट्रासह मध्य भारतातील अनेक भागात पावसाने विश्रांती घेतली असून पुन्हा राज्यवासीयांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, पुढील काही दिवस तरी राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता नाही, असे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे.

राज्यात यंदा हवामान बदलाचे परिणाम तीव्र होताना दिसत आहेत. त्यातच यंदा मान्सूनच्या संपूर्ण हंगामावर प्रशांत महासागरातील ‘एल निनो’ स्थितीचा प्रभाव असणार आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा खडतर असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, यंदा उन्हाळ्यात राज्यात दीर्घ काळ तीव्र उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागला. यादरम्यान उष्णतेच्या लाटेसदृश्य स्थितीची अनेकदा नोंद झाली. जून महिन्यात मान्सूनचा हंगाम सुरू झाल्यानंतरही उष्णता कायम होती.

मागील काही दिवसात कोकण प्रदेश आणि मध्य महाराष्ट्रातील घाट विभाग वगळता उर्वरित राज्यात समाधानकारक पावसाची नोंद झाली नाही. त्यामुळे अनेक भाग दुष्काळाच्या सावटाखाली आहेत. सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने राज्यातील अनेक भागात कमाल तापमानात काहीशी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांना पुन्हा उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, मंगळवारी कमाल तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

राज्यात पुढील काही दिवस सर्वदूर पावसाची शक्यता कमीच आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्या मान्सूनला बळ देणा-या हवामान प्रणालींचा अभाव असल्याने काही भागात हलक्या सरींची नोंद वगळता पावसाची नोंद होत नसून पुढील काही दिवस हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, मंगळवारी आणि बुधवारी राज्यातील बहुतांश भागात हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच बुधवार ते शनिवार यादरम्यान विदर्भातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यादरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात हलक्या सरींची नोंद होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, निम्मा महाराष्ट्र अजूनही कोरडाच असून काही प्रदेशात सरासरीहून कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|जुलै महिना, पण बाजारात अजूनही माठांचाच थाट
03:28
Video thumbnail
Latur News|मुरुडमध्ये धक्कादायक प्रकार; दुचाकी थेट नाल्यात
01:03
Video thumbnail
Latur Traffic Police|बूथ तयार... पण पोलीस गायब! लातूरच्या वाहतूक व्यवस्थेचं वास्तव
03:54
Video thumbnail
Latur|कुष्ठधाममध्ये LCB ची धडक; २ किलोहून अधिक गांजा जप्त!
02:10
Video thumbnail
Dharashiv|तावशी गड ग्रामपंचायतीत चार महिन्यांपासून कचरा बकेट पडून; ग्रामस्थांचा जाब
01:07
Video thumbnail
Nanded|फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करून युवकाने विचारला पक्षांतराबाबत जाब
01:28
Video thumbnail
Nanded|कामारी जि.प. शाळेत शिक्षकांच्या उशिरा हजेरीवर पालकांचा संताप
03:26
Video thumbnail
"फ्लॅट नाही, कार नाही, शेतीही नाही!"... लग्न ठरवण्यासाठी पिंपरीच्या तरुणाचा थेट रस्त्यावर फ्लेक्स!
00:25
Video thumbnail
Parbhani|थकीत सोयाबीन पैशांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
02:13
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये सलून सेवांच्या दरात वाढ; महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय
02:41
Video thumbnail
Explainer|SC उपवर्गीकरणावर महाराष्ट्र का पेटला? | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | संविधान काय सांगतं?
05:41
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू
02:36
Video thumbnail
Latur|तिसऱ्यांदा कोसळली लोखंडी कमान; तरीही प्रशासन झोपेत?
02:53
Video thumbnail
Latur|तलाठ्याने जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याचा आरोप; पीडित शेतकऱ्याचे आमरण उपोषण
01:54
Video thumbnail
Latur|कर्जमाफीच्या निर्णयानंतर लातूरमध्ये राष्ट्रवादीचा जल्लोष; रोहित पवारांचे मानले आभार
01:51

Latest news