खलाशाच्या मृत्यू प्रकरणी इराणला समन्स

तेहरान : होर्मुझ सामुद्रधुनीत संयुक्त अरब अमिरातीच्या दोन तेलवाहू जहाजांवर इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला, तर अन्य आठ जण जखमी झाले. या हल्ल्याचा भारताने मंगळवारी तीव्र निषेध केला. व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे आणि होर्मुझ सामुद्रधुनीसारख्या आंतरराष्ट्रीय मार्गांमधील सुरक्षित वाहतुकीत अडथळा आणणे हे चिंताजनक असल्याचे भारताने म्हटले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत भारताने सोमवारी इराणच्या उप-राजदूतांना परराष्ट्र मंत्रालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावल्याचे समजते. भारताने इराणच्या अधिका-यांना समन्स बजावून या घटनेबाबत जाब विचारल्याचे समजते.

ओमानच्या सागरी हद्दीतील होर्मुझ सामुद्रधुनीच्या दक्षिण सागरी मार्गावरून प्रवास करणा-या मोम्बासा आणि अल बहिया या दोन जहाजांवर इराणने क्रूझ क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाला आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यात जखमी झालेल्या आठ जणांमध्ये सहा भारतीय आणि दोन युक्रेनियन नागरिकांचा समावेश आहे. जखमींपैकी चार जणांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. या हल्ल्यानंतर, इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने पुन्हा एकदा अमेरिकेवर आरोप केला आहे. अमेरिकेने ओमानच्या बाजूने असलेल्या बेकायदेशीर मार्गावरून जहाजांची वाहतूक सुरू केली, असा दावा इराणने केला आहे. तसेच हा मार्ग धोकादायक असून या भागात सुरुंग पेरण्यात आले असल्याचा दावाही त्यांनी केला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|जुलै महिना, पण बाजारात अजूनही माठांचाच थाट
03:28
Video thumbnail
Latur News|मुरुडमध्ये धक्कादायक प्रकार; दुचाकी थेट नाल्यात
01:03
Video thumbnail
Latur Traffic Police|बूथ तयार... पण पोलीस गायब! लातूरच्या वाहतूक व्यवस्थेचं वास्तव
03:54
Video thumbnail
Latur|कुष्ठधाममध्ये LCB ची धडक; २ किलोहून अधिक गांजा जप्त!
02:10
Video thumbnail
Dharashiv|तावशी गड ग्रामपंचायतीत चार महिन्यांपासून कचरा बकेट पडून; ग्रामस्थांचा जाब
01:07
Video thumbnail
Nanded|फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना फोन करून युवकाने विचारला पक्षांतराबाबत जाब
01:28
Video thumbnail
Nanded|कामारी जि.प. शाळेत शिक्षकांच्या उशिरा हजेरीवर पालकांचा संताप
03:26
Video thumbnail
"फ्लॅट नाही, कार नाही, शेतीही नाही!"... लग्न ठरवण्यासाठी पिंपरीच्या तरुणाचा थेट रस्त्यावर फ्लेक्स!
00:25
Video thumbnail
Parbhani|थकीत सोयाबीन पैशांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
02:13
Video thumbnail
Nanded|हिमायतनगरमध्ये सलून सेवांच्या दरात वाढ; महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय
02:41
Video thumbnail
Explainer|SC उपवर्गीकरणावर महाराष्ट्र का पेटला? | सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय | संविधान काय सांगतं?
05:41
Video thumbnail
Latur Traffic Police|लातूर वाहतूक पोलिसांची धडक मोहीम; नियम मोडणाऱ्यांवर कारवाई सुरू
02:36
Video thumbnail
Latur|तिसऱ्यांदा कोसळली लोखंडी कमान; तरीही प्रशासन झोपेत?
02:53
Video thumbnail
Latur|तलाठ्याने जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याचा आरोप; पीडित शेतकऱ्याचे आमरण उपोषण
01:54
Video thumbnail
Latur|कर्जमाफीच्या निर्णयानंतर लातूरमध्ये राष्ट्रवादीचा जल्लोष; रोहित पवारांचे मानले आभार
01:51

Latest news