25 C
Latur
Thursday, July 3, 2025
Homeलातूरवांजरखेडा-लोदगा पाटी रस्त्याची दुरवस्था

वांजरखेडा-लोदगा पाटी रस्त्याची दुरवस्था

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
वांजरखेडा-ंिबदगीहाळ-लोदगा पाटी या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यात मोठे खड्डे पडून त्यात पाणी साठल्याने वाहनचालकांसह नागरिकांना प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे. पण्यामुळे खड्डयाचा अंदाज येत नसल्याने अपघाताची स्थीती निर्माण झाली आहे असून संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करावी, अशा मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे.  हालकी वांजरखेडा फकरानपुर ंिबदगीहाळ, कवठा, होळी येथील नागरिकांना जाण्या-येण्यासाठी शिरूर अनंतपाळ ते लातूरच्या मुख्य रस्त्याला जोडणारा हा एकमेव जवळचा रस्ता असून या रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. प्रवाशी नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
   दरम्यान या रस्त्याचे गेली वीस वर्षापासून काम झालेले नाही. हा रस्ता शिरूर अनंतपाळ, निलंगा, औसा व  लातूर या चार तालुक्यांच्या सिमेवर असून हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. सद्यस्थितीत हा रस्ता पाणंद रस्त्यापेक्षा खराब झाला आहे. जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या विषयी प्रशासनाला वारंवार  माहिती देऊनही रस्त्याचे काम झाले नाही. परिणामी शिरुर अनंतपाळ ते लातूर महामंडळाची बस यामुळे बंद झाली असून विद्यार्थी व नागरिकांना  ये-जा करण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे.
   या रस्त्यावरून पावसाळ्यात पायी चालणेही कठीण झाले असून आठ दिवसांच्या आत या रस्त्याचे काम मार्गी लावावे अन्यथा वरील दर्शविलेल्या गावातील नागरिकांना प्रशासन व लोकप्रतिनिधीला गावात येण्यास बंदी घालू व शासनाचा महसुलकिंवा इतर विविध प्रकारचा महसूल भरणा केला जाणार नाही, असा इशारा विठ्ठलराव भाऊसाहेब पाटील सहसचिव मराठवाडा जनता विकास परिषद, शाम सूर्यवंशी, प्रताप भोसले, शिवाजी माने, श्रीमंत सुरवसे  यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR