शिक्षण क्षेत्रातील ‘लातूर पॅटर्न’च्या ख-या ‘हिरों’चा सन्मान 

लातूर : प्रतिनिधी
लातूरमधील शिक्षणक्षेत्रामध्ये प्रामाणिकपणाच्या व गुणवत्तेच्या आधारावर शिक्षणाचा पवित्र ‘लातूर पॅटर्न’ निर्माण करणा-या लातूरमधील शिव छत्रपती शिक्षण संस्थेच्या राजर्षी शाहू महाविद्यालय व दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद विज्ञान महाविद्यालय या ‘लातूर पॅटर्न’च्या ख-या ‘हिरों’चा सन्मान दि. ३१ मे रोजी ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील परिवाराच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.  येथील औसा रोडवरील तुलसी बॅक्वेट हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमास शहराच्या महापौर जयश्रीताई सोनकांबळे, प्राचार्य अनिरुद्ध जाधव, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी, शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. अजय जाधव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, अ‍ॅड. श्रीकांत उटगे,  प्रा. बी. व्ही. मोतीपवळे, राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपस्थित मान्यरांनी मनोगत व्यक्त करताना ‘लातूर पॅटर्न’कसा घडला, याबाबत सविस्तर विवेचन केले. नीट परीक्षेचा अभ्यासक्रम ‘एनसीआरटी’तयार करते आणि १० वी, १२ वीचा अभ्यासक्रम राज्य शासनाच्या शिक्षण मंडळाकडून तयार केला जातो. नीटची परीक्षा संपूर्ण देशासाठी समान घेतली जाते. परंतु, १२ वीची परीक्षा देशासाठी समान का घेतली जात नाही?, असा प्रश्न उपस्थित करुन नीट परीक्षेचा अभ्यासक्रम आणि १२ वी परीक्षेचा अभ्यासक्रम यात मोठी तफावत असल्यामुळे नीटच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेगळी तयारी करावी लागते. यातूनच विद्यार्थ्यांचा खाजगी क्लासकडे जाण्याचा ओढा वाढतो. याकडे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
राजर्षी शाहू महाविद्यालय आणि दयानंद विज्ञान महाविद्यालय या दोन ज्ञान मंदिरांनी ४०-५० वर्षांत खुप मेहनतीने शिक्षणाचे पावित्र्य जपतले. त्यांच्या योगदानातूनच शिक्षण क्षेत्रातील ‘लातूर पॅटर्न’घडला. या दोन्ही महाविद्यालयांतील चांगल्या शिक्षणसेवकांचा गौरव करण्याचे भाग्य मला लाभल्याने, असे ज्येष्ठ समाजसेवक विनायकराव पाटील कवठेकर प्रास्ताविकात  म्हणाले. या कार्यक्रमात प्राचार्य अनिरुद्ध जाधव, डॉ. अजय जाधव, प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, लक्षमीरमण लाहोटी, रमेश बियाणी यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. शिववाजी गायकवाड, प्राचार्य डॉ. बिराजदार, प्राचार्य आर. एल. कावळे यांच्यासह शिक्षणक्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

निवडणुकीचे विविध साहित्य, सामग्रीचे दर निश्चित

लातूर : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत विविध राजकीय पक्ष, उमेदवार...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
भाडेकरार मोडून शेतकऱ्यांची फसवणूक; 'टी.एस. विंड पॉवर' कंपनीच्या विरोधात तहसीलसमोर आमरण उपोषण
02:14
Video thumbnail
लातूर-बार्शी रोडवरील 'मोटेगावकर' यांचा कोट्यवधींचा प्लॉट चर्चेत; सीबीआयच्या रडारवर बेनामी मालमत्ता?
03:12
Video thumbnail
पीक विम्याचा घोळ: शेतकरी संघटनेचा आक्रमक पवित्रा; जिल्हा कृषी अधीक्षकांना जमिनीवर बसवून केले आंदोलन
04:25
Video thumbnail
धाराशिव-बीड-लातूर विधान परिषद निवडणूक: बसवराज पाटील आणि महेश देशमुख यांच्यात थेट लढत; अर्ज दाखल
02:06
Video thumbnail
अमर राजूरकर यांचा भाजप कडून उमेदवारी अर्ज दाखल; ३०० पार मतांचा विश्वास
06:35
Video thumbnail
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद लाइव्ह
16:58
Video thumbnail
नांदेड जिल्ह्यात वादळी पावसासह अर्धापुरात गारपीट; उद्याही 'येलो अलर्ट' कायम
01:34
Video thumbnail
Latur|राजमाता अहिल्यादेवींचे विचार घराघरात पोहोचले पाहिजेत : दिलीपराव देशमुख
05:50
Video thumbnail
Latur|लातूर रेल्वे स्थानकाच्या विकासाला वेग; बहुप्रतीक्षित पिटलाईन डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार
02:27
Video thumbnail
Nanded|तारण ठेवलेल्या सोन्यावरच बँक अधिकाऱ्यांचा डल्ला; SBI मधील 85 लाखांचा घोटाळा उघड
03:58
Video thumbnail
Latur|लातुरात अहिल्यादेवी जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
04:21
Video thumbnail
मास्टर ब्लास्टरचा पाककौशल्य 'सिक्सर'; सचिन तेंडुलकरने बनवले खास उकडीचे मोदक
00:40
Video thumbnail
थिएटरच्या स्क्रीनमधून थेट स्कॉर्पिओ बाहेर! व्हिडिओ पाहून प्रेक्षकांची धांदल
00:18
Video thumbnail
अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याची दृश्ये कॅमेऱ्यात कैद; पहा 'क्लिअर' व्हिडिओ
00:30
Video thumbnail
मराठा आरक्षण आंदोलन; सरकारच्या सकारात्मक भूमिकेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतले उपोषण
00:56

Latest news