22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रसंगमनेरमध्ये विखे-थोरात वाद पेटला

संगमनेरमध्ये विखे-थोरात वाद पेटला

संगमनेर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव सुजय विखेंच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. सुजय विखेंनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात शड्डू ठोकत प्रचारालाही सुरुवात केली आहे. दरम्यान, सुजय विखेंनी काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांचा उल्लेख राजकन्या असा केला होता. त्यानंतर जयश्री थोरात यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले होते. मात्र, आता त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वाद पेटला आहे.

सुजय विखे यांच्या सभेत बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात आज झालेल्या सभेच्या वेळी हे वक्तव्य करण्यात आले. सभेदरम्यान वसंतराव देशमुख यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. सुजय विखे मंचावर उपस्थित असताना जयश्री थोरात यांच्याबद्दल खालच्या पातळीवर टीका करण्यात आली. टीका करणारे वसंतराव देशमुख धांदरफळ गावातील रहिवासी आहेत. त्यानंतर कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी थेट वाहनांची मोडतोड केली. त्यामुळे निवडणुकीआधीच विखे-थोरात वाद चांगलाच पेटला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR