24.5 C
Latur
Monday, September 23, 2024
Homeलातूरसकल धनगर समाजाचा शेळ्या-मेंढ्यांसह रास्ता रोको

सकल धनगर समाजाचा शेळ्या-मेंढ्यांसह रास्ता रोको

लातूर : प्रतिनिधी
धनगर अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी लातूर शहरातील पु. अहिल्यादेवी होळकर चौकात चंद्रकांत हजारे व अनिल गोयकर दुस-यांदा बेमुदत उपोषणास बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा सोमवारी १५ वा दिवस होता. त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना पाठींबा म्हणून सकल धनगर समाजाच्या वतीने पु. अहिल्यादेवी होळकर चौकात शेळ्या-मेंढ्यांसह तीन ते चार तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे संपुर्ण वाहतूक ठप्प झाली होती.
धनगर समाज एस. टी. आरक्षण अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. शहरातील पु. अहिल्यादेवी होळकर चौकात सकाळी १० वाजल्यापासून समाज बांधव एकत्र येण्यास सुरुवात झाली होती. शहर व ग्रामीण भागातील समाज बांधव या रास्ता रोको आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. शेळ्या-मेंढ्यांचेही चौकात रिंगण करण्यात आले होते. धनगरी ढोल, घोषणांनी या चौकात रास्ता रोको करण्यात आला. विविध पक्ष, संघटनेत कार्यरत धनगर समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सकल धनगर समाज या बॅनरखाली एकत्र आले होते.
 शेळ्या-मेंढ्यांसह करण्यात आलेल्या या रस्ता रोकोमुळे पु. अहिल्यादेवी होळकर चौकातील वाहतूक ठप्प झाली होती. रस्ता रोको आंदोलनानंतर मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर यांच्या मार्गदर्शनात उपोषणस्थळी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवली गेली. सरकार प्रत्येक वेळेस फसव्या घोषणा करत आहेत, त्यामुळे समाजाची दिशाभूल होत आहे. त्यामुळेच यापुढे एकजुटीने समाजाची दिशा ठरवून मार्गक्रमण असणार आहे, अशी भूमिका धनगर समाजाने यावेळी व्यक्त्त केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR