परभणी : जिल्हा पोलिस दलातील कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी असा नावलौकीक असलेल्या प्रकाश कुमावत यांची सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक (एएसआय) पदावर पदोन्नती झाली आहे. या पदोन्नतीबद्दल पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिस अधीक्षक पंकज कुमावज यांनी प्रकाश कुमावत यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलिस अधीक्षकांनी त्यांना जनतेशी संवेदनशीलतेने वागत प्रामाणिकपणा, निष्ठा आणि जबाबदारीची भावना जपत कर्तव्य बजावण्याचा सल्लाही दिला.
मानवत येथील मुळचे रहिवासी असलेल्या प्रकाश कुमावत यांनी आज पर्यंतच्या पोलिस दलातील कार्यकाळात विविध ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी करत कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि जनतेच्या विश्वासाला पात्र ठरणारे अधिकारी अशी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांच्या या पदोन्नतीमुळे सहकारी अधिकारी, कर्मचारी, मित्र परिवारासह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोालस निरीक्षक गजेंद्र सरोदे, नवा मोंढा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महादेव मांजरमकर यांच्यासह कार्यालयीन व नवा मोंढा पोलीस स्टेशन अधिकारी व कर्मचा-यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या पदोन्नतीबद्दल मानवत शहरातील नातेवाईक, मित्र परीवारासह जिल्हाभरातील विविध स्तरातील नागरिकांमधून प्रकाश कुमावत यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
















