पूर्णा : तालुक्यातील धनगर टाकळी येथे राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक हायस्कूल येथे दि.१२ सप्टेंबर रोजी गणेश उत्सवानिमित्त सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन केले होते. यातील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी खूप मोठ्या उत्साहात सामान्य ज्ञान परीक्षा पार पडली. या परीक्षेत एकूण ३५२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या परीक्षेसाठी एकूण तीन गट करण्यात आले होते. पहिला गट ५वी ते ७वी, दुसरा गट ८वी ते १०वी, तिसरा गट ११वी ते १२ वी. होता. गावातील सर्व गणेश मंडळाचे सदस्य, अध्यक्ष, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, शिक्षेकेत्तर कर्मचारी व गावकरी मंडळी यांनी परीक्षा पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
दि.१३ सप्टेंबर रोजी निकाल व बक्षीस वितरन सोहळा पार पडला. या परीक्षेत २१ मुलांनी/मुलींनी बक्षीस पटकावले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष गोदावरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामकिशन रौदळे होते. नायब तहसीलदार प्रशांत थारकर, चुडावा सपोनि. नरसिंग पोमनाळकर, कंठेश्वर येथील वैद्यकीय अधिकारी सुरेश गिनगीने, केंद्रप्रमुख उमाकांत देशेटवार, तलाठी राजेंद्र बाहेकर, कृषी सहाय्यक शिवप्रसाद भोसले आदिंनी मार्गदर्शन केले. तसेच सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना पुढच्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.