सायबर फसवणूक, ऑनलाईन आर्थिक गुन्ह्यांविरोधात गांधी चौक पोलिसांकडून जनजागृती

लातूर : प्रतिनिधी
डिजिटल व्यवहारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असताना सायबर फसवणूक व ऑनलाईन आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. मोबाईल व इंटरनेटचा वापर वाढला असला तरी सायबर सुरक्षेबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे अनेक नागरिक आर्थिक फसवणुकीला बळी पडत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण करून आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना विविध जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून दि. ७ जुलै रोजी गांधी चौक पोलीस स्टेशन व अ‍ॅक्सिस बँक, मार्केट यार्ड शाखा, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी चौक परिसरात सायबर फसवणूक व ऑनलाईन आर्थिक चोरी या विषयावर विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये नागरिकांना सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रकार, त्यापासून बचाव करण्याचे उपाय तसेच फसवणूक झाल्यास तातडीने कोणती पावले उचलावीत याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सायबर गुन्ह्यांविरोधातील जनजागृती हीच सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. नागरिकांनी डिजिटल व्यवहार करताना सतर्कता बाळगल्यास मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक टाळता येऊ शकते, असा विश्वास उपस्थित अधिका-यांनी व्यक्त केला. सदर कार्यक्रमास गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील रेजीतवाड, पोलीस उपनिरीक्षक सौ. सावित्री रायपल्ले, अ‍ॅक्सिस बँक मार्केट यार्ड शाखेचे शाखा प्रमुख विलास लोखंडे, ऑपरेशन हेड दत्ता जाधव, सेल्स मॅनेजर केदार देशपांडे, गोल्ड लोन सेल्स मॅनेजर आशीष साळुंके, विभागीय अधिकारी  बंडेवार, एरिया मॅनेजर जितेंद्र पाठक, वैभव चिंचणे, किशोर माने, मंगेश पवार, शुभम शेटे, प्रसाद देशपांडे, सौ. कविता चिकटे, ओम पाटील यांच्यासह बँकेचे अधिकारी-कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

द्वारकादास शामकुमारतर्फे १८०० वारक-यांची विनामूल्य पंढरपूर वारी 

लातूर : प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त गेली १५ वर्षांपासुन द्वारकादास शामकुमार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
46:16
Video thumbnail
Latur|लातूर मनपाच्या स्थायी समिती बैठकीत फाईल गहाळ प्रकरणावर मोठा गदारोळ!
02:27
Video thumbnail
Latur|वासनगाव–गंगापूर रस्त्याची अखेर तातडीने दुरुस्ती सुरू!
01:50
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
00:00
Video thumbnail
LIVE-श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळा २०२६
09:33
Video thumbnail
Solapur|अक्कलकोटमध्ये पावसाची दडी; खरीप पेरण्या पूर्णपणे रखडल्या!
01:56
Video thumbnail
Latur|औसा अतिक्रमणाच्या विळख्यात; नगरपरिषदेला नागरिकांचा घेराव!
03:45
Video thumbnail
Latur|लातूरच्या इतिहासात पहिल्यांदाच! बुद्ध विहाराला 'क' दर्जाचे तीर्थक्षेत्र
03:17
Video thumbnail
Latur|४०वर्षे विकासाचा वनवास; नागरिकांचा संताप अनावर!प्रबुद्धनगर, महादेवनगर, कॉलनीची दयनीय अवस्था
03:42
Video thumbnail
Parbhani|परभणीत भरदिवसा जीवघेणा हल्ला;साक्ष न देण्याच्या वादातून भरदिवसा रक्तरंजित हल्ला!
03:31
Video thumbnail
Latur|शाळकरी विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली
02:53
Video thumbnail
Dharashiv|टायगर ग्रुपचा स्तुत्य उपक्रम; १,००० विद्यार्थ्यांना शालेय पॅडचे वाटप
01:40
Video thumbnail
रोनाल्डोच्या विश्वचषक प्रवासाचा भावुक शेवट; पोर्तुगालला पराभूत करत स्पेन पुढे सरकला
00:36
Video thumbnail
आषाढी वारी: संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून रवाना; उद्या माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
00:37
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये एक्सपायरी बदलून शेती औषधांचे वितरण? मोठा गौप्यस्फोट
01:08

Latest news