लातूर : प्रतिनिधी
तालुक्याील सोनवती येथील मोहन जाधव या शेतक-याने शेतजमीन गहान ठेवुन त्यांच्या -हदयाच्या शस्त्रक्रियेसाठी सावकाराकडून ६ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. जाधव यांनी सावकारास एका वर्षात व्याजासह १३ लाख रुपये परत केले. मात्र सावकाराने जाधव यांची शेतजमीन परस्पर विक्री केल्याचा आरोप करीत जाधव यांनी शेतामध्येच सहकुटुंब बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
मोहन जाधव यांनी ६ लाखांचे कर्ज घेतले परंतु, त्यांनी एका वर्षात कर्जाच्या व्याजासकट १३ लाख रुपये सावकाराला दिले. परंतु, त्या सावकाराने मोहन जाधव यांची शेतजमीन परस्पर विक्री केली आहे, असा आरोप मोहन जाधव या शेतक-याने केला आहे. तसेच या शेतक-याने जिल्हा उपनिबंधक कार्यालयातही तक्रार दिली. परंतु, तेथूनही फक्त तारीख पे तारीख देण्यात येत असल्यामुळे अखेर मोहन जाधव यांनी त्यांच्या शेतातच कुटूंबासह बेमुदत उपोषण गेल्या तीन दिवसांपासून सुरु केले आहे.
आता प्रशासन यावर काय कारवाई करते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
















